यवतमाळ सामाजिक

बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार

बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार

दोन महिन्यांमध्ये अकरा बेवारस मृतदेहांवर अंतिम संस्कार

दिनांक 10/06/2024 रोजी अंदाजे वय वर्ष 50 ते 60 वर्ष वयाचा वृद्ध माणूस शासकीय रुग्णालय परिसरात रात्री दहा वाजता आढळून आला कर्तव्यावर हजर असलेले वार्ड बॉय तारीख मोहम्मद खलील यांनी त्यास सरकारी इस्पताळामध्ये दाखल केले डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर शहर पोलीस स्टेशनला त्याची माहिती देण्यात आली शहर पोलीस स्टेशन ने त्याच्या नातेवाईकाचा शोध सुरू केला परंतु तीन दिवस झाल्यानंतर शोध न लागल्यामुळे शहर पोलीस स्टेशन ने नंददीप फाउंडेशनच्या मदतीने त्या बेवारस वृद्धावर अंतिम संस्कार केले यावेळी शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत एकनाथ काळुसे पोलीस शिपाई पवन नांदेकर नंददीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप शिंदे नरेंद्र पवार कृष्णा मुळे निशांत सायरे व मोक्षधाम सेवा समितीचे प्रशांत बिसेन व मोहन ठाकूर आधी उपस्थित होते

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©