यवतमाळ सामाजिक

यवतमाळ जिल्हा नंद गवळी समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

यवतमाळ जिल्हा नंद गवळी समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

17 जून 2024 रोजी भावे मंगल कार्यालय  यवतमाळ येथे नंद गवळी समाजाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना  मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि गौरवचिन्ह देवून सत्कार करण्यात  आला.                                            या सत्कारप्रसंगी अध्यक्षस्थानी  महाराष्ट्र  गवळी समाजाचे मा. अध्यक्ष  बाबासाहेब गळाट होते. प्रमुख पाहुणे म्हणून गोपाळराव अवथळे,गुरुवर्य प्रदीप दादा पंजाबी कपाटे, मनीषजी बोपटे,संजय अरबट, मोरेश्वर गळाट, वसंतरावजी काळे, कैलास अवथळे,  गाडेकर मनोज गळाट,देवरावजी चेके,तुकारामजी चेके,विनोद कालोकार,अमोल घसाड पवन पाने,विकास घाटोळ ,प्रथमेश घाटोळ,अमोल चावरे चेतन अवथळे तिलक चेके,शाम काकडे, संतोष झामरे,नंद गवळी समजातील ज्येष्ठ शिक्षक श्रीकांत काळे ,यादव घोडे ,यवतमाळ जिल्हा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओंकारजी चेके,सुधाकर डोळे,मोहन चावरे,अनील चावरे,लीलाधर चावरे,भास्कर साठे रमेशराव झामरे, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.या सत्कारप्रसंगी श्रीकांत काळे , यादवजी घोडे  ,संजयजी काळे , प्रितम चावरे ,  आणि बाबासाहेब गलाट यांनी आपल्या विचारातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु विद्या अवथळे यांनी केले असुन प्रास्ताविक सुरज चावरे आणि आभार प्रदर्शन शामभाऊ काकडे यांनी केले. या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्यातील गवळी समाजातील विद्यार्थी व पालक माता भगिनी ,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright ©