Breaking News यवतमाळ

शेतात विज पडुन शेतकऱ्याचा मृत्यु

प्रवीण राठोड प्रतिनिधी 

शेतात विज पडुन शेतकऱ्याचा मृत्यु

अकोला बाजार : शेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा अंगावर विज पडल्याने जागीच मृत्यु झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता दरम्यान सालोड शेत शिवारात घडली. महेश नारायणराव टेकाळे वय 45 रा. अकोला बाजार असे मृतकाचे नाव आहे.

महेश हा सध्या नागपुर येथे राहतो. तीन दिवसापूर्वी तो शेतात पेरणीसाठी गावी अकोला बाजार येथे आला होता. शुक्रवारी दुपारी तो एक भासा आणि एका मित्रासह शेतात गेला होता. घटनेच्या पुर्वी तो पोहण्यासाठी विहिरीत उतरला होता. विहिरीत पोहून तो बाहेर आला तेव्हा पाऊस सुरु झाला. अंग पुसून कपडे घालण्याकरिता तो शेतातील निंबाचे झाडाखाली थांबला. त्याच क्षणी त्या झाडावर विज कोसळली आणि विजेच्या स्पर्शाने महेश जागीच ठार झाला. यावेळी सोबतचे दोन सहकारी लगतच्या झाडाखाली थांबले होते. सुदैवाने ते या घटनेतून बचावले.

घटना माहित पडताच नागरिकांनी घटनास्थळी पोहचून हळहळ व्यक्त केली. जमादार भाऊराव बोकडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत पोस्ट मार्टम करीता यवतमाळ येथे रवाना केले. मृतकचे पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, तीन बहिणी व मोठा आप्त परिवार आहे.

Copyright ©