महागाव ता. प्र.निलेश नरवाडे
नवखा साहेबराव उमरखेड विधान सभेच्या पटलावर सर्वांना जड जातोय
महागांव : विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. सर्वत्र विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. प्रत्येक पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी नेत्यांपासून तर कार्यकर्त्यां पर्यंत आप आपली फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. त्यात काँग्रेस, भाजपा, शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (शरदचंद्रजी पवार गट) तर राष्ट्रवादी (अजितदादा गट) या सर्वच पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी उमरखेड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता आप आपली शक्ती पणाला लावून कंबर कसली आहे.
प्रत्येक पक्षाचे अनेक दिग्गज आप आपल्या पक्षाला अपणालाच उमेदवारी मिळावी म्हणून ” मी किती चांगला” हे दाखविण्यात मग्न आहेत. अंत्यविधी पासून लग्न कार्यापर्यंत इच्छुक उमेदवार हजेरी लावत आहे. पक्षाला “मी किती चांगला” हे मात्र दाखवीत असतांना ” त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जनतेसाठी किती विकासाची कामे केली आणि विधानसभेचा किती विकास केला याचा मात्र प्रत्येकाला विसर पडला आहे असे ही बोललं जात आहे. हे सर्व रणधुमाळी सुरू असतांना दीड वर्षा पूर्वी एका नवख्या साहेबराव कांबळे यांची एन्ट्री उमरखेड विधानसभा मतदारसंघात होते आणि पाहता पाहता साहेबराव लोकांच्या मनात घर करून जाते.
नवखा असलेला साहेबराव कांबळे हा माणूस उमरखेड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला आलेली मरगळ दूर करून पक्षापासून आत्मविश्वास हरवलेल्या गेलेल्या कार्यकर्त्यांच्या मनात पुनःश्च काँग्रेस जिवंत करण्याचं काम करतोय. हे उमरखेड विधानसभेतील कार्यकर्त्यांना आणि जनतेला माहीत आहे. हे सर्व करत असताना तो अनेक उपक्रम सुद्धा राबवितो. आणि दीड वर्षात संपूर्ण उमरखेड विधानसभा पिंजून काढतो. ग्रामीण भागापासून मुंबई पर्यंतचे काम एका झकट्यात करून देतो, मग तो दवाखाना असो की सुशिक्षित बेरोजगारांचे असो असे अनेक कामे सहज करतो. म्हणूनच जनतेतून असे बोलल्या जात आहे .की साहेबराव कांबळे यांनी कमी वेळात अधिक पल्ला गाठला असल्याचे सांगितलं जात आहे.मग हे सर्व काही असतांना काही जण साहेबरावचा विरोध करीत असल्याचे दिसून येत आहे. लोकशाही आहे. प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे आणि या अगोदर प्रत्येक पक्षाच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मागण्याकरिता आपली इच्छा दर्शविली मग साहेबराव हे पहिले व्यक्ती आहेत का? ज्यांनी उमेदवारी मागण्यांसाठी इच्छा दर्शविली. मग इतकी आगपाखड कशाला? आणि कशाला साहेबराव चा विरोध. हा विरोध करण्यापेक्षा आपण काय केलंय हे पहिले स्वतः आत्मपरीक्षण करावं असे ही जनतेतून बोललं जात आहे.मग याचा अर्थ असा तर नाही ना? की उमरखेड विधानसभा मतदारसंघातील जनता साहेबरावला भावी आमदार मानत आहे. आणि येणाऱ्या काळात साहेबराव हेच या उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आहे. आणि याच कारणास्तव काही जण साहेबरावचा विरोध करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणून उमरखेड विधानसभा मतदारसंघातील जनतेतून अस ही बोलल्या जात आहे की ” नवखा साहेबराव उमरखेड विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर सर्वांना जड भरतो काय? असंही बोललं जात आहे
Add Comment