यवतमाळ राजकीय

यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा – प्रहार संघटनेची मागणी

यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा – प्रहार संघटनेची मागणी

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे त्वरित पंचनामे करून त्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी.

यवतमाळ जिल्हा प्रामुख्याने संपूर्ण महाराष्ट्रात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखण्यात येतो.जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड खरीप हंगामात केली जाते.कापूस हे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे नगदी पीक आहे.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने, शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.जिल्ह्यात यावर्षी सरासरी जून-जुलै महिन्यात एकूण ५७६ मिलिमीटर पाऊस पडला आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उपजीविका पूर्णपणे शेतीवरती अवलंबून आहे.रोजगाराच्या कुठल्याही दुसऱ्या संधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उपलब्ध नाही आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण सुद्धा विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक आहे.प्रति शेतकरी जमीन धारकतेचे प्रमाण सुद्धा नगण्य आहे.अतिवृष्टीमुळे शेतात भरपूर पाणी साचले असून, प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. पाण्याचा निचरा सुद्धा जमिनीतून व्यवस्थित होत नाही आहे.कृषी व महसूल विभागाने तात्काळ शेतजमिनीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी.व यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.अशी मागणी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन मिर्झापुरे यांनी निवेदनाच्या माध्यमातून मा.जिल्हाधिकारी यवतमाळ,पंकज आशिया यांना केली आहे.दरम्यान प्रमोद कातारकर, श्रीकांत घोंगडे,कपिल देशमुख,राजेश बनसोड,सचिन कळसकर,अमन राऊत,राजकुमार मडावी,शुभम लाकडे,इमरान दानी,गणेश उनसे, प्रतीक वाघमारे व प्रा.पंढरी पाठे तसेच इत्यादी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©