यवतमाळ सामाजिक

5 ऑगस्ट: श्रावण मास आणि व्रते _लेख : श्रावणी सोमवार आणि शिवामूठ शिवमुष्टीव्रत

कृपया प्रसिद्धीसाठी

 

5 ऑगस्ट: श्रावण मास आणि व्रते _लेख : श्रावणी सोमवार आणि शिवामूठ शिवमुष्टीव्रत

श्रावण मास आणि श्रावणी सोमवार व्रत प्रारंभ

श्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत)

प्रस्तावना – हिंदू धर्म शास्त्रानुसार चातुर्मास प्रारंभ झाल्यावर (म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशीनंतर) येणारा पहिला मास हा श्रावण मास होय. रूढी परंपरेनुसार या मासापासून व्रत वैकल्ये सुरु होतात. या मासाला पवित्र मास म्हणतात. या मासात श्रावणी सोमवार, नागपंचमी, मंगळागौर पूजन, गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, शुक्रवारचे व्रत अशी अनेक व्रते केली जातात. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी ‘श्रावणी सोमवार’ हे व्रत केले जाते. या वर्षी हे व्रत 5,12,19,26 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर या दिवशी असणार आहे. श्रावण मासातील सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीला अभिषेक घालणे,पूजा करणे, शिवामूठ वाहणे अश्या प्रकारे हे व्रत केले जाते. प्रस्तुत लेखातून ‘श्रावणी सोमवार’ हे व्रत कशाप्रकारे अंगीकारावे, याविषयी विवेचन करण्यात आले आहे.

सोमवार व्यतिरिक्त अन्य व्रते धर्माने सांगितल्या प्रमाणे आणि रूढी परंपरेनुसार सुरु असतात. अश्या या पवित्र श्रावण महिन्यातील व्रते भक्ती भावाने करून त्या माध्यमातून देवतेचे तत्व ग्रहण करून

घेऊया.

प्रत्येक सोमवारी करावयाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार – श्रावण महिन्यातील दर सोमवारी शंकराच्या देवळात जाऊन त्याची पूजा करावी आणि शक्य असल्यास निराहार उपवास करावा किंवा नक्त व्रत करावे. यामुळे शंकर प्रसन्न होऊन शिवसायुज्य मुक्ती मिळते.

श्रावण सोमवारी उपवास करून शिवाची विधीवत् पूजा करण्याचे महत्व ग्रंथ व्रत राज यामधील खालील श्लोकातून केले आहे. याचा अर्थही पुढे दिला आहे.

‘उपोषितः शुचिर्भूत्वा सोमवारे जितेन्द्रियः।

वैदिकैर्लौकिकैर्मन्त्रैर्विधिवत्पूजयेच्छिवम् ।।’

अर्थ : संयम आणि शुचिर्भूतपणा आदी नियमांचे पालन करत सोमवारी उपवास करून वैदिक अथवा लौकिक मंत्राने शिवाची विधीवत् पूजा करावी.

शास्त्रकारांनी मनावर संयम ठेवून, शुचिर्भूतपणादी नियम पाळण्याविषयी, तसेच उपवास करण्याविषयी सांगितले आहे. त्याचप्रमाणे आपापल्या ज्ञानाच्या आधारे शक्य असेल, त्या वैदिक अथवा लौकिक मंत्रांद्वारे शिवाची पूजा करायला सांगितली आहे.

शिवाची पूजा कशी करावी हे जाणून घेऊया

1) आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. 2) शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या चित्राची पूजा करावी. 3)शिवाच्या चित्रसुद्धा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी. 4)वरीलपैकी काहीही शक्य नसेल, तर शिवाचा ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो.’

शिवाची षोडशोपचार पूजा किंवा पंचोपचार पूजा करू शकतो.पूजा करताना शिवाला पांढरे फुल वाहू शकतो. त्रिदल बेल वहावा. शिवाला अर्ध प्रदक्षिणा घालावी.त्या दिवशी शिवाचा ‘ॐ नम: शिवाय असा नामजप अधिकाधिक करावा.

शिवामूठ व्रत करण्याची पद्धत – विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केले जाते. श्रावण मासात येणार्‍या चार सोमवारी 4 प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते. विवाहानंतरची पहिली पाच वर्षे क्रमवार हे व्रत केले जाते. यात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू (पाचवा सोमवार आल्यास त्या दिवशी) या धान्याच्या पाच मुठी देवावर वाहाव्या.

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’संकलक : सौ.सुनीता खाडे,यवतमाळ.संपर्क- 9970752507

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©