यवतमाळ सामाजिक

उघड्यावर आलेल्या परिवारास नितीन मिर्झापुरे यांनी दिला मायेचा आधार

उघड्यावर आलेल्या परिवारास नितीन मिर्झापुरे यांनी दिला मायेचा आधार

पंचायत समिती यवतमाळ अंतर्गत येणाऱ्या रुई वाई येथे

मागील एक महिन्यापासून सुरु असलेल्या संततधार पावसाने यवतमाळ जिल्ह्यातील मोलमजुरी करणाऱ्यां नागरिकांचे हाल होत आहेत.ना काम मिळत आहे,ना पैसा मिळत,यातच रुई (वाई) येथील लक्षणं हागरे हे परिवार अत्यंत गरीब आहे. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक झालेल्या संततधार पावसाने संपूर्ण घरचं कोसळले.ना डोक्यावर छत ना झोपायला कोरडी जागा, राहिली.अशातच हि बाब प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन मिर्झापूरे यांना माहित होताच त्यांनी रुई गाव गाठले.आणि या परिवाराचा शोध घेत त्यांना वेळीच योग्य ती मदत देऊन व राहण्या करिता टिन-पत्रे देऊन घर उभे करून दिले.तसेच लवकरच घरकुल यादी मध्ये नाव कसे घेता येईल या बाबत पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.या वेळी हागरे परिवाराने कृतघ्नता व्यक्त केली.या वेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन मिर्झापूरे , नानू गावंडे, पिंटू काळे,आकाश ढेकाले, जागेश्वर साखरकर, शरद गायधणे, धीरज मोरे, सचिन कळसकर वैभव कोकिवार.. उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©