Breaking News यवतमाळ

स्विफ्ट कारच्या धडकेत दुचाकी स्वार गंभीर

स्विफ्ट कारच्या धडकेत दुचाकी स्वार गंभीर

यवतमाळ आर्णी राष्ट्रीय महामार्गावर हिवरी पासून दोन कि. मि अंतरावर तलावा जवळ दुपारी 3.30 वाजता यवतमाळ कडून आर्णी कडे जात असताना हा अपघात झाला

एम एच 29/आर 4502 स्विफ्ट कारनी एम एच 29/बी झेड 1145 ला धडक देताच कार चालक मालक वाहन सोडून फरार झाले या  या अपघातात दुचाकी स्वार दोघे  गंभीर जख्मी झाले यात धीरज राजेंद्र गिरी वय 45 याचा एक पाय निकामी झाला असल्याचे सांगण्यात आले तर सोबत असलेली इसमाचे नाव मात्र कळाले नसून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे सांगण्यात आले असून या घटनेची चौकशी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे गजानन खांदवे करीत आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©