शेतकरी कर्ज माफी साठी शेतकरी पुत्राचे बेमुदत आमरण उपोषण
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देण्यात यावी या मागणीसाठी ५ ऑगस्ट पासून शेतकरी पुत्र कुणाल जतकर बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहे जो पर्यंत सरकार शेतकऱ्यांच सरसकट कर्ज माफ करत नाही तोपर्यंत शेतकरी पुत्र कुणाल जतकर उपोषण मागे घेणार नाही. शेतकरी पुत्राने वारंवार आंदोलन करून, कधी रक्ताने पत्र तर कधी विष बॉटल घेऊन टॉवर वर चढुन तर कधी कधी स्वतःची बैल गाडी जाळून शेतकरी कर्ज माफी साठी आंदोलने केली पन सरकार अद्यापही कर्ज माफी बाबत निर्णय घेण्यास तयार नाही त्यामुळे शेतकरी पुत्रानी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. शेतकरी सतत ची नापिकी, शेतमालाला योग्य तो भाव मिळत नाही. कीटकनाशके, बी बियाणे, खत, यांचे भाव प्रचंड प्रमाणात वाढले त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे, यासाठी शेतकरी पुत्र कुणाल जतकर शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आग्रही आहे . शेतकरी उपस्थित होते वैभव काळे उपसरपंच साकुर, सय्यद जुनेद उपसरपंच, शेख फिरोज ग्रामपंचात सदस्य, विठ्ठल मेश्राम, दुर्गेश भिवणकर, अंकुश भराडे, सतीश कापडे, गजानन राऊत, सुमित नीकडे, निलेश वाघमोडे, गजानन देडे, राम काळे, विजय आत्राम, सुरेश तोरकडे,
Add Comment