चला रक्तदान करुया नात नव घडवूया!
स्वातंत्र्यदिनी भव्य रक्तदान शिबिर
यवतमाळ : रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदानामुळे लाखों लोकांना जीवनदान मिळते, त्यामुळे रक्तदान हे जीवनदान असे म्हणणे आता वावगे ठरणार नाही. याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनी एस के. ऑटोडिल व मित्र परिवार, तसेच विविध सामाजिक संस्था च्या वतीने स्वातंत्र्यदिनी चला रक्तदान करुया नात नव घडवूया! या उपक्रमांतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जनतेने आपले प्रामाणिक कर्तव्य समजून रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
हे शिबिर 15 ऑगस्ट रोजी यवतमाळ येथील शिवशक्तीलॉन स्टेट बँक चौक येथे सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी एस. के. ऑटो डिल यवतमाळ व मित्र परिवार संयोजक शैलेश करीहार यांचेशी संपर्क करावा
या रक्तदान शिबिरात शहरातील विविध सामाजिक संघटनांचा राहणार सहभाग राहणार आहे. रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान रक्तदान शिबिराचे आयोजक शैलेश करीहार यांनी केले आहे
Add Comment