*मातोश्री विद्यालय महागाव येथे “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा”टप्पा क्र. 2 चे उद्घाटन*
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गतप्रकल्पाचा दुसरा टप्पा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत सदर प्रकल्पाचा दुसरा टप्पा दि. 05 ऑगस्ट 2024 रोजी सुरु झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य ए. व्ही. गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम दिवस लोकशाही राज्यपद्धतीचा अवलंब करून विद्यार्थी वर्गात निवडणूक घेऊन उमेदवारी अर्ज ते निकाल प्रक्रिया या पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. विजय उमेदवार यांच्यातून मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,शालेय शिक्षणमंत्री, क्रीडामंत्री,स्वच्छता मंत्री, ई. मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले. मतदार म्हणून सर्व विद्यार्थी सहभागी होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले. खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Add Comment