राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई करा ! हिंदु जनजागृती समितीचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर !
‘हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्राध्वजाचा सन्मान राखा’ मोहिमेचे 21वे वर्ष’
राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने फडकवले जातात, मात्र हेच राष्ट्रध्वज त्याच दिवशी कचरापेटीत, गटारात अन फाटलेल्या अवस्थेत आढळतात, प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्ट न झाल्याने या राष्ट्रध्वजांची विटंबना अनेक दिवस पहावी लागते, राष्ट्र ध्वजाची ही विटंबना रोखावी, आणि शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक ध्वज विक्रेत्यांवर कार्यवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांना 5 ऑगस्ट या दिवशी देण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस कार्यालयाला यासंदर्भात पत्रक पाठवून, प्लास्टिक ध्वज विक्रेत्यांवर कार्यवाई करू, असे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह विभागाच्या छाया काळे यांनी यावेळी निवेदन स्वीकारले.
राष्ट्रध्वजाचा योग्य तो सन्मान विद्यार्थ्यांकडून राखल्या जावा, आणि मुलांमध्ये या विषयी जनजागृती व्हावी, यासाठी समितीच्या वतीने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना सुद्धा निवेदन देण्यात आहे.
निवेदन देतांना श्री मनोज औदार्य, हिंदू महासभेचे लक्ष्मणलालजी खत्री, पतंजली योगपीठचे संजय सांबारे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सागर लुटे,सुमित मुनेश्वर, विश्व हिंदू परिषदचे विनोद अरेवार, धनगर समाज संघटनेचे पवन धोटे, निलेश चामाटे, हिंदू जनजागृती समितीचे दत्तात्रय फोकमारे, विजय जाधव, प्रशांत सोळंके उपस्थित होते.
Add Comment