महागाव प्रतिनिधी निलेश नरवाडे
जल जीवन मिशन योजनेच्या कामात विलंब!
” दीड वर्षानंतर ऐन पावसाळ्यात आत्ता चालू केलेल्या कामामुळे गावातील रहदारीचा फोडल्याने गावात चिखलमय वातावरण निर्माण झाले. “
फुलसांगवी लगतच्या शिरपुल्ली येथे ऐन पावसाळ्यात जलजीवन मिशन योजनेचे पाईपलाईन खोदण्याचे काम गावांमध्ये चालू असल्यामुळे गावामध्ये सर्वत्र चिखलच चिखल झालेला आहे. गावकऱ्यांना या कामाचा अतोनात त्रास होत आहे. कित्येक जण मोटरसायकल घेऊन या चिखलामध्ये पडले तर गावामध्ये फोर व्हीलर वाहन येऊ शकत नाही. चिखलामध्ये फसत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना तर घराच्या बाहेर पडणे सुद्धा मुश्किल झाले आहे गावकरी कमालीचे त्रस्त झाले आहे.
शिरफुली या गावात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत अंदाजे 70 लाखाच्या जवळपास असणारे काम फुलसांगवीच्या एका ठिकेदाराने दीड वर्षापासून काम घेतले आहे . ठेकेदारामार्फत या गावाच्या व्यतिरिक्त इतरत्र ठिकाणचे कामे असल्याने कि काय ? या ठिकाणचे काम करण्यासाठी आतापर्यंत दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. परंतु आता ऐन पावसाळ्यात काम चालू केले, हे कामे पावसाळ्यात करण्याचे शासनाचे आदेश आहेत कि काय? हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करीत असल्याच्या गावकऱ्यांच्या तक्रारी आहेत.पाईपलाईन खोदकाम करत असतांना गावकऱ्यांनी ठेकेदाराला सांगितले की, पावसाळा संपल्यानंतर गावातील पाईपलाईन चे काम करा आणि तोपर्यंत पाण्याच्या टाकीचे व विहिरीचे काम पूर्ण करा. गावकऱ्यांनाही चिखलाचा त्रास होणार नाही. परंतु गावकऱ्यांचे काही एक ऐकून न घेता ठेकेदारामार्फत घाईगडबडीने हे काम लवकरात लवकर कसे आटोपेल ,म्हणून ठेकेदारांकरवी चालू असलेले काम थातूरमातूर पद्धतीचे होत असल्याचा गावकऱ्याचा आरोप आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ठेकेदाराने शिरफुली गावाचा रहदारीचा रोड फोडल्यामुळे गावात सर्वत्र चिखलमय वातावरण झाले. यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेतून गावात खत-बियाणे आणतांना चिखलामुळे मोठी दमछाक होत आहे. गावात कोणते वाहन येत नाही. परिणामी या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना कमालीचा मनस्ताप होत आहे.
शिरपूली या गावात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत चे काम मागील दहा-पंधरा दिवसापासून चालू झाले. पाईपलाईन टाकण्यासाठी ठेकेदाराला गावातील सिमेंटचा रस्ता फोडावा लागला, त्यामुळे सध्या पावसाळा असल्याने चिखल तर झालाच, गावकऱ्यांच्या सोयीसाठी लवकरात लवकर ठेकेदारा करवी रस्ता चांगला करून घेण्यात येईल.
के. एम. जामकर,
सचिव, ग्रामपंचायत कार्यालय शिरपूली
Add Comment