अल्झायमरग्रस्त महिलेला सुरक्षित घरी पोहोचवले
नंददीप फाउंडेशन ची समयसुचकता
दिनांक ३ सप्टेंबर रोजी स्थानिक उमरसरा भागांमध्ये एक ६० वर्षीय शम्माबी शेख सत्तार नामक महिला वेड्यासारखी बडबडत असल्याचे सोहम कोल्हे,विवेक इंगळे यांना आढळले. त्यांनी तात्काळ नंददीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्याशी संपर्क साधला संदीप शिंदे यांनी त्यांना बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे निवारा दिला व चौकशी केल्यानंतर त्या अल्झायमरच्या पेशंट असल्याचे कळले. त्यांना खूप कमी गोष्टी आठवत होत्या त्यांना विसरभोळेपणा असल्यामुळे त्या घरचा पत्ता विसरल्या होत्या परंतु आता त्यांना घरी जायचं होतं परंतु घर कुठे आहे याबाबत त्यांना नेमकी माहिती सांगता येत नव्हती तेव्हा नंददीप फाउंडेशनचे मनोरुग्ण सेवक निशांत सायरे यांनी त्यांच्या घराचा पत्ता शोधण्यासाठी शोध मोहीम राबवली. यवतमाळ शहरातील स्थानिक पाटीपुरा भागापासून ते डोर्लीपुरा भागापर्यंत शोध चालला शेवटी त्यांच्या भावाचा शोध लागला व त्यांना सुरक्षित पाहून घरातील सर्वांचा जीव भांड्यात पडला घरातील सर्वजण त्यांना चार दिवसापासून शोधत होते स्थानिक शहर पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती. घरच्यांनी सुद्धा विसरभोळेपणामुळे शम्मा शेख घरून निघून जात असल्याचे सांगितले व नंददीप फाउंडेशन चे नरेंद्र पवार,प्रकल्प संचालिका नंदिनी शिंदे परिचारिका किशोरी मेश्राम कांचन केळकर व कार्यालयीन सहाय्यक आरती गाडगे यांनी त्यांची तीन दिवस सेवा करून त्यांना सुरक्षित घरी पोहोचले याबद्दल शम्माबी शेख सत्तार यांचे भाऊ हसन खान रोशन खान यांनी नंदादीप फाउंडेशनचे मनापासून आभार मानले.
Add Comment