पोळा कृषी उत्सव हा श्रमिकांचा सन्मान डॉ विष्णू उकंडे
बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र असून कष्टकरी श्रमीकांच्या जीवावरच समाज सुख उपभोगत आहे .यामुळे पोळा कृषी उत्सव हा श्रमिकांचा सन्मान आहे .असे प्रतिपादन डॉ. विष्णू उकंडे यांनी केले
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत स्व. भारत सिंह ठाकूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जवळा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ या महाविद्यालयाच्या वतीने पोळा कृषी उत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी पोळा या उत्सवा दरम्यान विजय संपादित बैल जोडी ना बक्षिसाचे वाटप करण्यात आले
उत्कृष्ट बैल जोडी सजावट करिता स्व. भारत सिंह ठाकूर यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्मृतीचिन्ह आणि रोख एक हजार रुपये जयंत कारमोरे तसेच उत्कृष्ट बैल जोडी देखभाल करिता स्वर्गीय कृषिभूषण मधुकर अण्णा दुदुलवार स्मृती प्रित्यर्थ स्मृतिचिन्ह आणि रोख 1000 रुपये आनंद पंचभाई यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना डॉक्टर विष्णू उकंडे यांनी
महाविद्यालयाच्या वतीने आयोजित या स्पर्धेचे तोंड भरून कौतुक केले
शेतकरी जीवनावरील या प्रकारच्या पशुपालकांसाठीच्या स्पर्धा घेणे म्हणजे महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना जीवनाचा खरा धडा देणे आहे आपण समाजाचे उत्तरदायित्व पूर्ण करीत आहोत याचेच ही स्पर्धा प्रतिक आहे असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी आपल्या बोलण्यातून केले
या कार्यक्रमाला जवळा ग्रामपंचायत च्या सरपंच प्रणिता आडे, डॉक्टर तनया संजय दूदुलवार, अमोल मधुकरराव दूदूलवार, सामाजिक कार्यकर्ते माधव राठोड प्रकाश कारमोरे धर्माजी जाधव दत्ताजी तडसे पुरुषोत्तम ठाकरे आणिस सोलंकी आदी मान्यवरांची उपस्थिती होती तर या कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता डॉक्टर अनंत सिंह ठाकुर कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक ज्योतिपाल देशपांडे लक्ष्मणराव भुजाडे प्रफुल कारमोरे योगेश तडसे तथा महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनी परिश्रमा घेतले
Add Comment