महाराष्ट्र राजकीय

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील चिंचोली येथील भटके विमुक्त आघाडी च्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

वर्धा प्रतिनिधी पंकज तडस

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील चिंचोली येथील भटके विमुक्त आघाडी च्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

आमदार समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक तसेच युवा कार्यकर्ते आमदार समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.

हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील चिंचोली येथील भटके विमुक्त आघाडी च्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आमदार समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला.

कार्यक्रमाचेवेळी कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांचेसह भटके विमुक्त आघाडीचे प्रमुख प्रल्हाद दांडगे, तूषार आंबटकर, रामकृष्णजी मुंगले, सुनीलभाऊ डोंगरे, माजी नगरसेवक अमन काळे , अमोल खंदार इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©