यवतमाळ सामाजिक

राष्ट्रीय महामार्ग बांधकामा मुळे जलजिवन योजना विस्कळीत

राष्ट्रीय महामार्ग बांधकामा मुळे जलजिवन योजना विस्कळीत

किन्ही येथील ग्राम पंचायत अंतर्गत विविध विकास कामे प्रलंबित आहे राष्ट्रीय महामार्ग बांधकामा मुळे रस्ते खुले न केल्याने कामास अडथळा निर्माण झाला आहे प्रथमच गावात पाणी समस्या अनेक वर्षा पासुन सुरु नुकतीच शासनाने जलजिवन मिशन हि योजना सुरू केली मात्र येथील महामार्गामुळे हि योजना  केवळ थंड बस्त्यात पडलेली आहे या मुळे गावातील प्रत्येक विकास कामात अडथळा निर्माण होत आहे हा महामार्ग करण्यात आला या वेळी इतर कोणताही विचार न करता महामार्गाचाच विचार करण्यात आला सर्व सामान्यांच्या यात विचारच करण्यात आला नाही त्या मुळे ग्रामीण जनतेला अनेक समस्येला सामोरे जावे लागत आहे प्रत्येक गावाजवळ रस्ते बंद करण्यात आले त्या ठिकाणी विकास बंद झाला गाव सोडून एक की.मी.अंतरावर निवारा केला त्यात कुणी जाऊच शकत नाही नको तितक्या लांब बाय पास दिला त्या मुळे दूरवरून कुणी येऊ शकत नाही म्हणून चुकीच्या मार्गाने येतात त्या मुळे जीव गमवावा लागतो एकाही बाय पास वर स्ट्रीट लाईट दिले नाही त्या मुळे अपघात मात्र अटळ आहे अशा अनेक समस्या या महामार्गवरील निर्माण झाल्याने सर्व सामान्यांचे जीव धोक्यात आले आहे या प्रकरणी किन्ही ग्रामपंचायत सरपंच ज्ञानेश्वर गुहाडे उपसरपंच प्रमोद नाटकर सचिव वांय डब्लु काळे सदस्य यांनी येथील रस्ता खुला करून देण्याची मागणी निवेदना द्वारे केली आहे मात्र अजूनही दखल घेत नसल्याने ग्रामपंचायत आंदोलनाची पवित्रा घेण्याची तयारी दर्शवली आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©