यवतमाळ सामाजिक

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतीसुर्य बिरसा मुंडानी बलिदान दिले

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतीसुर्य बिरसा मुंडानी बलिदान दिले

माजी राज्यमंत्री संजय देशमुख

भगवान बिरसा मुंडा जयंती दिनी शहरात भव्य दिव्य मिरवणुक तर ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात जयंती साजरी

 

प्रतिनिधी /दिग्रस

 

दिग्रस येथील बिरसा मुंडा चौकात क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची १४८ वी जयंती साजरी करण्यात आली. सर्व प्रथम भगवान बिरसा मुंडा पुतळ्याचे मान्यवरांचे हस्ते पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवा निवृत तहसिलदार बी.टी. कन्नाके यांच्या हस्ते पिवळ्या ध्वजाचे अनावर करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे माजी राज्यमंत्री संजय देशमुख, सेवा निवृत्त न्यायाधीश अँड.किशोर राठोड, शि.से उपजिल्हा प्रमुख राजकुमार वानखडे, काँग.जिल्हा सरचिटणीस राजासिंह चव्हाण, उठाबा उपजिल्हा प्रमुख यादव गावंडे, कु.ऊ.बा.स सभापती सतिष तायडे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पेदोर, भाजपचे ता.अध्यक्ष रवींद्र अरगडे,काँग्रेसचे ता.अध्यक्ष शंकर जाधव, राष्ट्रवादीचे ता.अध्यक्ष लालसिंग राठोड, माजी नगरसेवक के टी जाधव, रमाकांत काळे, काँ शहर अध्यक्ष दिनेश सुकोडे, शिवसेना शहर अध्यक्ष प्रणित मोरे, समता दुत ज्सोना बडोले, नम्रता खारोडे, अभय धुर्वे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर,सेवा निवृत्त शिक्षण अधिकारी (प्रा) प्रमोद सुर्यवंशी, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, गटविकास अधिकारी आर आर खारोडे, गटशिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार, मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिमराव खारोडे, सुत्र संचालन पुरुषोत्तम कुडवे तर आभार प्रदर्शन दिलीप जवादे यांनी केले. तर या प्रसंगी माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना,

क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांनी जुलमी राजवटी विरुद्ध बंड पुकारुन आपले न्याय हक्क प्राप्त करून देण्यासाठी सर्वाना संघटित केले. तसेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिले. आणि समाजावर होणारा अन्याय, अत्याचार, तसेच जल जंगल, जमिनीसाठी आंदोलनं केले. सध्या अशीच परिस्थिती जिल्हात अधिकारीवर्गा कडुन आदिवासी समाजाच्या शेत जमीनीचे प्रकरणात मोठी हेराफेरी सुरू आहे. याकरिता मोठे आंदोलन उभारले पाहिजे. तरुणांनी महापुरुषांचे विचार आत्मसात केले पाहिजे. असे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी समता दुत ज्सोना बडोले यांनी बिरसा मुंडानी एकाच वेळी सर्व ठिकाणी सशक्त क्रांती केली.यालाच आपण आंदोलन म्हणतो. ही क्रांती आजही आवश्यक आहे. आपल्या राज्यघटनेचे तत्व हे बिरसा मुंडा च्या विचारातून केलेले आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता न्याय यावर आधारित आपली राज्यघटना आहे. हे नाव प्रत्येकांनी जोपासले पाहिजे. असे विचार मांडले.

यावेळी उपस्थित दिपक वानखडे, रमेश चव्हाण, सखाराम तुडलवालर,अनिल भरारे एल पी राठोड, विठ्ठल आडे दिनद्याल चौधरी, सुदर्शन हजबे, राजु ढोले, तुळसीराम राठोड, प्रदिप नगराळे, भारत बडे, अजय कांबळे, राजु ठाकरे,किशोर कदम, पी जी गावंडे,एम आर सोळंके,हरशिल शहा, प्रजोत अरगडे, अनिल इंगोले, अशोक पवार सह ईतर समाज बांधव मोठया संखेने उपस्थित होते. तसेच सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि पत्रकार बांधवानी आपली उपस्थिती दिली होती.

Copyright ©