Breaking News यवतमाळ

हिवरी येथील जेतवन येथे तलावात बुडून दोन चिमुकलीचा मृत्यु

हिवरी येथील जेतवन येथे तलावात बुडून दोन चिमुकलीचा मृत्यु

हिवरी येथील पर्यटन स्थळ जेतवन येथे सायंकाळी ५:३० वाजताच्या दरम्यान लाहान तलावात बुडून दोन चिमुकलीचा मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ वेक्त करण्यात येत आहे

हिवरी येथील बुद्धिस्थ पर्यटन स्थळ असून या ठिकाणी देश वेदेशा मधून अनेक पर्यटक येत असतात अशातच महागाव कसबा येथील सरपंच तथा ग्रामीण पत्रकार संघाचे दारव्हा तालुका अध्यक्ष किशोर बिहाडे हे आपल्या परिवारा समवेत जेतवन येथे आले असता कु.रिया किशोर बीहाडे वय १२ महागाव, कुं.काव्या धर्मपाल मदार वय १३ रां. मंगरूळपिर  ह्या दोघी खेळत असताना बाजूला असलेल्या लहान तलावात  पाय घसराला आणि दोघीही पाण्यात पडल्या हि बाब किशोर बिहाडे यांच्या लक्षात येताच त्यांनी मोबाईल वरून संपर्क करून हिवरी येथील संतोष खंडागळे हे अविनाश मारबते, गोलू शहारे,विकास शेंद्रे, यांनी घेऊन बचाव कार्य केले अनिल चव्हाण जवळा याचे ही त्या दोन्ही मुलींना बाहेर काढण्या करिता प्रयत्न केले परंतु बराच वेळ झाल्याने त्यांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात रविन्द्र सिंग काकस यांनी वाहन चालवत रुग्णालयात नेउन  दाखल करण्यात आले या वेळी पुरुषतम कामठे यांनीमदत कार्य केले त्या दोन्ही मुलींना रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्या दोन्ही मुलींना मृत घोषित केले या वेळी  तातडीने यवतमाळ ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक अमोल डहाके,सचिन पोतकमवार संजय राठोड पो पा.दिगाबर शहारे जेतवनचे संचालक घटना स्थळी उपस्थित होते

Copyright ©