‘ त्या ‘चिमुकल्या मुलींना अश्रूपूर्ण निरोप.. गाव हळहळलं !
यवतमाळ आर्णी मार्गावर जेतवन परिसरात घडलेल्या दुःखद घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या त्या दोन निरागस चिमुकल्या मुलींना जड अंतःकरणाने महागाव कसबा येथे अश्रूपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी संपूर्ण गाव हळहळले.
काल सायंकाळी हिवरी येथील जेतवन परिसरातील तलावात बुडून कु.रिया आणि कु.काव्या या दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी अंत झाला. महागाव कसबा येथील सरपंच किशोर बिहाडे हे मुलगी कु.रिया व भाची कु. काव्या यांना घेवून सहकुटुंब जेतवन येथे गेले होते. खेळता खेळता जेतवन परिसरातील तलाव त्या चिमुकल्या मुलींसाठी काळ ठरला. तलावात बुडून दोघींचा करुण अंत झाला. कु. रिया ही महागाव कसबा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चवथी मध्ये शिकत होती तर कु.काव्या धम्मापाल भगत ही पुणे येथे तिसऱ्या वर्गात शिकत होती. त्या दोघी आतेबहीण मामे बहीण होत्या. आज चिमुकल्या मुलींचे पार्थिव महागाव क येथे आणले असता सारे गाव गलबलून गेलं. कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. विशेष म्हणजे २० नोव्हेंबर रोजी कु.रियाचा जन्मदिवस असून वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला रिया व काव्या या गोंडस, निरागस चिमुकल्या मुलींवर अंत्यविधी करण्याचा विदारक प्रसंग ओढवला.रियाच्या वाढदिवसाला अनेक स्वप्न रंगविण्यात आले होते वाढदिवसाची पूर्व तयारीही सुरू होती, आणि त्यांचेवर काळानी हिरावून नेले त्यांची बौद्ध धर्मातील रीतिरिवाजा प्रमाणे आज दु.३.०० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. धरणीमायच्या कुशीत त्या दोघी बहिणी कायमच्या विसावल्या तेव्हा उपस्थित नातलग व गावकऱ्यांचे डोळे पाणावले! बिहाडे व भगत परिवारातील त्या दोघी एकुलत्या एक मुली होत्या. त्यांच्या पश्चात आजी, आई वडील व भाऊ आहे. पुणे येथील राहत असलेली बहिण भावाला भाऊ बीजे निमित्त भावाला ओवाळणी साठी परीवारा समवेत महागाव येथे आले होते,कधीही एका कुटुंबावर दुःख ओढ्वल्या जाते त्या वेळी बहिण, भाऊ एक मेकांना धीर देतात परंतु या वेळी कुणी कुणाला धीर द्यायचा कारण बहिण भावाच्याच दोन्ही मुलीचा एकाच वेळी अंत झाल्याने भाऊ तरी पाठीशी कसा उभा ठाकनार! आणि भावाला बहिण कशी धीर देणार असा समाज मनात द्विंधा निर्माण झाली होती.येथील अंत्यविधीला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Add Comment