मध्यप्रदेशातील मनोरुग्ण पुष्पा अखेर ठणठणीत नंददीप’च्या प्रयत्नातून मिळाले नवजीवन
तीन वर्षाच्या भटकंतीला विराम
यवतमाळ: मुलगी शिकली प्रगती झाली असे आपण अनेकदा ऐकतो.परंतु,मुलींना उच्चशिक्षण देण्यासाठी बरेच कुटुंबीय आग्रही नसतात. त्यांचे विवाह लावून दिल्यानेच आपले कर्तव्य संपले असाही काहींचा समज असतो.मात्र यातून आलेल्या मानसिक तणावाचे संतुलन काहींना साधता येत नाही.अशीच एक खरी घटना मध्यप्रदेशातील पुष्पाची आहे.मानसिकरित्या दुभंगलेली पुष्पा तीन वर्षांपासून घरून निघून गेली मात्र तिला ‘नंददीपचा आधार मिळाल्याने तिच्यावर यशस्वी उपचार झाले असून ती आता ठणठणीत बरी होऊन १७ नोव्हेंबरला आपल्या घरी परतली आहे.
बारावीत विज्ञान शाखेतून चांगल्या टक्क्यांनी उत्तीर्ण होऊन पुढे आलेल्या शैक्षणिक अपयशातून घरच्यांनी तिचे लग्न लावून दिले.मात्र दुर्दैवाने महिन्याभरातच तिच्या नवऱ्याचे निधन झाल्याने ती अस्वस्थ झाली.तिला मानसिकरित्या आधार देण्याचे सोडून तिच्या सासरच्या मंडळींनी तिला लग्नात मिळालेल्या भेट वस्तूंची तोडफोड करून तिच्या माहेरी पाठवले त्यामुळे ती अधिकच नैराश्यात गेली.या प्रकारचा जाब विचारण्यासाठी ती परत आपल्या सासरी गेली परंतु,तिथेही तिला वाईट वागणूक मिळाल्याने ती असंतुलित झाली आणि एप्रिल २०२० पासून ती मध्यप्रदेश,बेंगलोर आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या राज्यात भटकंती करू लागली. तिच्या सैरभैर प्रवासाला मात्र नंददीप फाऊंडेशन सारखा दिशादर्शक मिळाल्याने तिच्या असंतुलित जीवनाला संतुलित करण्याचे प्रयत्न सुरू झाले.सामाजिक भान जपणारे मानसोपचार तज्ज्ञ डॉ.श्रीकांत मेश्राम यांच्या तीन वर्षाच्या उपचाराने ती आता ठणठणीत बरी झाली आहे. १७ नोव्हेंबरला मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात येणाऱ्या बैहर तालुक्यातील दमोह या तिच्या मूळगावी तिच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात आले.मनोरुग्ण सेवक निशांत सायरे यांच्याशी बोलताना पुष्पाची बहिणीला अश्रू अनावर झाले. नंददीप फाऊंडेशनचे संदीप तसेच नंदिनी शिंदे तसेच इथल्या या संवेदनशील दाम्पत्यामध्ये आम्ही देव पाहिला त्यांनी जोपासलेल्या माणुसकीच्या नात्यामुळेच मला माझी बहिण परत मिळाली,असे ती म्हणाली.या केंद्रातील मनोरुग्णांची आपुलकीने काळजी घेणाऱ्या परिचारिका किशोरी मेश्राम,अक्षय बानोरे,क्रुष्णा मुळे,कार्तिक भेंडे,विकी एकोणकार यांच्या कार्याप्रती पुष्पा व तिच्या कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली.
Add Comment