यवतमाळ सामाजिक

गुरुदेव सेवा मंडळ, मंगरूळ तर्फे बिरसा मुंडा जयंती साजरी

गुरुदेव सेवा मंडळ, मंगरूळ तर्फे बिरसा मुंडा जयंती साजरी

यवतमाळ :- श्री गुरुदेव सेवा मंडळ, मंगरूळ ( तरोडा ), ता. जि. यवतमाळ , नोंदणी क्रमांक एफ- २०९३८ तर्फे जननायक, धरती आबा, बिरसा मुंडा यांची जयंती हर्षोल्लासात साजरी करण्यात आली.

सामुदायिक प्रार्थनेनंतर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . गावातील नागरिकांनी मिरवणूक काढली होती, त्या मिरवणुकीतील तरुणांनी गुरुदेव सेवा मंडळामध्ये येऊन प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

बिरसा जननायकाचे चरित्र व कार्य प्रसंगी डॉ अनंतकुमार सूर्यकार यांनी कथन केले.

विठ्ठल कोडापे, रामेश्वर गावंडे, ज्ञानेश्वर मेश्राम, महादेव तुमडाम, गणेश सोनोने, मारोती पौळ, अनिल उईके, पवन उईके, किशोर धुर्वे, पप्पू निंबाळकर, आकाश सोयाम, राहूल मडावी, शंकर मडावी, सुरेश सिडाम, बहिणाबाई कोडापे, गोते ताई इ. कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.

Copyright ©