यवतमाळ सामाजिक

दिग्रस शहरातील कित्तेक लेआऊट मधील ओपन स्पेस चोरीला गेलेत याचा शोध घेण्याचे मुख्याधिकारी यांच्या पुढे मोठे अहवान

दिग्रस शहरातील कित्तेक लेआऊट मधील ओपन स्पेस चोरीला गेलेत याचा शोध घेण्याचे मुख्याधिकारी यांच्या पुढे मोठे अहवान

शहरातली मोठ-मोठया नगरात लहण्या सह मोठ्यांना खेळण्या बागडण्यासाठी मैदांच नाहित एका माजी नगर सेवकांच्या तक्रारीवरून झाले उघड

शहरातील मध्यवस्तीत असलेल्या राधा नगरी बंग लेआऊट मधला ओपन स्पेस चोरी गेला.आता नगर परिषद प्रशासनानी शोध घेऊन खुल्या जागेवर अवैधरित्या अनेक वर्षांपासून ताबा करणाऱ्यावर कार्यवाई करण्याचे मोठे आवाहन उभे ठाकले आहे. येथील नागरिकांनी अनेक वेळा पालिकेकडे अर्ज करुनही त्या खुल्या जागेचा उपयोग सामाजिक उपक्रम व लहान मुलांना तसेच वयवृध्द नागरिकांना मोकळे पणाने विरंगुळा करता येईल. लेआऊट टाकताना ओपन स्पेस स, करिता सोडणे बंधनकारक असते. शहरात अनेक लेआऊट आहे.या प्रत्येक लेआऊट मध्ये कुठे योगा भवन, व्यायाम शाळा, तर कुठे बगीचा सौंदर्यकरण, कुठे समाज भवन आहे. परंतु दिग्रस शहरातील अनेक धनाढ्यानी लेआऊट मधले ओपन पेस हडपल्याचे दिसुन येते. राधानगरी बंग लेआऊट मध्ये फेरफटका मारला असता ओपन पेस (खुली जागा) कुठेच दिसुन आला नाही. त्यामुळे ओपनपेस चोरीला गेल्याचे स्थानिक नागरिक सुध्दा उघड उघड बोलत आहे. शहरातील ओपन पेस अवैधरित्या हडपणारा वर कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी शहरातील ओपन पेसची चोरी करणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. ओपन स्पेस चोरी गेल्याची तक्रार जिल्हा अधिकारी यांच्या कडे एका माजी नगरसेवकाने केल्याचे बोलले जात आहे.

त्या खडाई रोड परिसरात दोन दिवसांपूर्वी नवीन लेआऊट झाले. अनेक प्लाटची खरेदी विक्री व्यवहारही झाले. या लेआऊट च्या एनए परवानगी व नकाशा मध्ये कुठेच नोंद नसल्याने या लेआऊट मधला ओपन स्पेस भुखंड माफियांने खाल्ला की काय अशी शंका उपस्थित होत आहे.

Copyright ©