यवतमाळ राजकीय

भारतीय जनता पार्टी यवतमाळ विधानसभा गाव-चलो अभियान कार्यशाळा संपन्न

भारतीय जनता पार्टी यवतमाळ विधानसभा गाव-चलो अभियान कार्यशाळा संपन्न

“देशसेवा, कार्याप्रती समर्पण आणि पक्षनिष्ठा जपा!” आ. मदनभाऊ येरावार.

भारतीय जनता पार्टी विधानसभा यवतमाळ द्वारा आयोजित ‘गाव चलो अभियान’ अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन दि २५ रोजी पंडित दीनद‌याल उपाध्याय प्रबोधीनी निळोणा येथे करण्यात आले. कार्यशाळेत 225 ग्रामिण तथा शहरी भागातील कार्यकर्त्यांनी भाग घेतला. अंत्योदय…, देशातील शेवटचं गाव शेवटचा माणूस मुख्यप्रवाहात आणून त्यांचा विकास करणे म्हणजे अंत्योदय ! हा मंत्र ही प्रेरणा देणारे प्रणेते पंडित दीनद‌याल उपाध्याय आणि त्यांचा वसा घेवुन, प्रेरणा घेऊन हे कार्य आसेतु हिमायलापर्यंत पोहचविण्याचा संकल्प करणारे आणि पूर्णत्वास नेण्यासाठी दिनरात कार्यरत असणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विकास कार्यास मदत करणे म्हणजे देशसेवा…! आणि ही देशसेवा करण्याची संधी आपणास प्राप्त झाली आहे. एक योद्धा म्हणून ते स्वीकारा” कार्याप्रती समर्पण आणि पक्षनिष्ठ जपा! श्रीराम अयोध्येत विराजमान झाले आहे. रामराज्य निर्माण करण्याची जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे. ‘उत्तिष्टत जाग्रत प्राप्यवरान्निबोधत’ हा स्वामी विवेकानंदाचा उपदेश आपल्या सोबत आहे ‘उठा जागे व्हा आणि ध्येय्याच्या दिशेने आगे कुच करा, असे आवाहन यवतमाळचे कर्तव्यदक्ष आमदार मदनभाऊ येरावार यांनी या कार्यशाळेत केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा जिल्हा सरविटणीस रेखाताई कोठेकर यांनी केले. बुध शक्तिशाली करुन केंद्र तथा राज्याच्या योजना लोकाभिमुख करण्यासाठी गाव चलो अभियान अत्यंत उपयोगी असून तन, मनाने हे कार्य आपण करूया, सबका साथ सब सबका विकास हा नारा सत्यात उतरवू या, असा आत्मविश्वास यवतमाळ विधानसभा प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी व्यक्त केला. दोन खासदारापासून सुरुवात करुन ३०३ खासदारापर्यंतचा प्रवास हा चमत्कार नसून साक्षातकार आहे समर्पित कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा…, त्यांनी घेतलेल्या कष्टाचे फळ आहे, असे प्रतिपादन डॉ. नितीनजी खर्चे या विचारवंतानी करुन कर्मयोध्याना प्रेरणा दिली. भाजपा जिल्हा सरविटणीस राजु पड‌गिलवार यांनी गावात जायचं असेल तर गावाचंच व्हा! भेदाभेद न पाळता जणू त्यांच्या कुटुंबातीलच एक होवून संवाद साधा, वातवरण निर्माण करा, त्यांच्यां समस्या जाणून घ्या व त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा, असा मोलाचा सल्ला दिला. कार्यक्रमाचा समारोप वाशीम यवतमाळ लोकसभेचे भाजपा समन्वयक नितीन भुतडा यांनी केला. संपूर्ण देशच नव्हे तर संपूर्ण विश्व आज नरेंद्र मोदीजी कडे एक विकास पुरुष व विश्वनेता म्हणून पाहत आहे ते त्यांच्या कार्यामुळे. आपल्याला या कार्यात खारीचा वाटा उचलायचा आहे. तो आपण उचलायचा आहे, असे वक्तव्य करून त्यांनी या कार्यशाळेचा समारोप केला. कार्यक्रमाचे सर्वांग सुंदर सूत्र संचालन यवतमाळ भाजपा शहराध्यक्ष शंतनु शेटे यांनी केले. आभार भाजपा ग्रामीण तालुकाध्यक्ष चिंतामणी पायघन यांनी मानले. मान्यवरांचे स्वागत योगेश पाटील, सुजित राय, अश्विन बोपचे, उमेश राठोड यांनी केले. मंचावर सौ.मायाताई शेरे, कीतीताई राउत, रेणुताई शिंदे ,गजानन गुन्हाणे, प्रशांत यादव पाटील, दत्ता राहणे, विजय कोटेचा, अभिषेक वखरे, बाळ कायपेलवार इ. मान्यवर होते.

Copyright ©