नागपूर सामाजिक

आर टी ई 25% आरक्षण म्हणजे काय?

आर टी ई 25% आरक्षण म्हणजे काय?

जाणून घ्या की आर टी ई मध्ये मुक्त आणि विनामूल्य आठवीपर्यंत शिक्षण कसे घेतात येऊ शकते?

मला हे ऐकून जरा पण आश्चर्य होत नाही जेव्हा लोक मला कॉल करतात आणि त्यांना आर टी ई 25 % आरक्षण बद्दल माहिती नसल्याचे बोलतात. दररोज असे कितीतरी कॉल येत असतात ज्यामध्ये काही जणांना याबद्दल काहीही माहिती नसल्याचे कळते तर काही जणांना अर्धवट माहिती आहे असे लक्षात येते आणि त्यावर अधिक माहिती मिळावी,यात कुणाचीही फसगत होऊ नये, याबद्दल त्यांना माहिती व्हावी म्हणून ते मला प्रश्न विचारत असतात. या प्रश्नांना उत्तर देऊन मी त्यांना या योजनेबद्दल माहिती देते आणि त्यांना इतरांनाही माहिती द्यावी म्हणून सांगत असते. अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांना उत्तर म्हणून मी हा लेख त्या सर्वा पालकांसाठी लिहिते आहे ज्यांना आर टी ई 25% आरक्षण बद्दल माहिती नाही. यामध्ये आर टी ई 25% आरक्षण या योजनेत भाग घेण्याकरिता किंवा आपल्या मुलाला किंवा मुलीला आर टी ई 25% आरक्षण चा लाभ व्हावा म्हणून मूलभूत माहिती दिलेली आहे. तरीसुद्धा याव्यतिरिक्त अशी कितीतरी प्रश्न तुमचा मनात असतील ज्यांचे उत्तर या लेख मध्ये नसतील तर तुम्ही मला कॉल किंवा व्हाट्सअप द्वारे प्रश्न विचारू शकता ज्याचे उत्तर तुम्हाला काही क्षणातच भेटतील. त्याकरिता माझा नंबर 9373733337 आहे.

सर्वात आधी हे जाणून घ्या की आर टी ई 25% आरक्षण म्हणजे काय? याचे उत्तर म्हणजे आर टी ई 25% या योजनेअंतर्गत ते पालक ज्यांची इन्कम एक लाखापेक्षा कमी असते आणि त्यांची इच्छा त्यांचा लेकरांना एखाद्या चांगल्या प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षण देण्याची असते अशा पालकांकरिता ही सरकार द्वारे भेटणारी एक योजना म्हणजेच आर टी ई 25% आरक्षण ही होय. या योजनेअंतर्गत 3 वर्ष ते 6 वर्ष पर्यंतच्या लेकरांचे शिक्षण हे नर्सरी पासून आठवी वर्गापर्यंत भेटत असते. यामध्ये 3 वर्षाचा बाळ नर्सरी करिता, 4 वर्षाचा बाळ KG 1 करिता आणि 6 वर्षाचा बाळ पहिली वर्ग करिता वयानुसार योग्य बसेल. आता पुढली जानकारी म्हणजे, असे गरजेचे नसते की आर टी ई 25% मध्ये येणाऱ्या सगळ्या शाळा नर्सरी पासून ॲडमिशन देते. काही शाळा नर्सरीमध्ये तर काही शाळा KG 1 मध्ये ऍडमिशन देतात पण जास्त तर शाळा पहिली पासूनच ऍडमिशन देत असते. पालक गणांना या गोष्टीवर लक्ष ठेवणे गरजेचे असते की ज्या शाळेत त्यांना आपल्या बाळाची ऍडमिशन करायची आहे ती शाळा कोणत्या वर्गापासून ऍडमिशन देते आहे आधी हे जाणून घ्या. दुसरी लक्ष ठेवणारी गोष्ट म्हणजे आर टी ई 25% चे अर्ज ऑनलाईन भरावे लागते. हे अर्ज भरताना सर्व माहिती अर्जामध्ये विचारले जाते ती भरणे गरजेचे असते जसे की मुलाचे नाव, आई-वडिलांचे नाव, जन्मतारीख, जात, पत्ता वगैरे वगैरे. त्यानंतर तुम्ही दिलेल्या पत्त्यानुसार त्याचा भोवताल तीन किलोमीटर अंतरावर येणाऱ्या सर्व शाळांचे नाव तिथे दाखवल्या जाते त्यापैकी कोणतेही दहा नाव आपण आपल्या पसंतीनुसार निवडू शकता. जर तुमचे नंबर लॉटरीमध्ये आले तर या दहा शाळांपैकी एका शाळेमध्ये तुमचा नंबर लागतो याकरिता हे लक्षात घ्या की शाळा जेवढी घराच्या जवळ असेल तेवढाच नंबर लागण्याचा चान्स जास्त असते. एकदा लॉटरीमध्ये नंबर लागले की नंतर तुम्ही अर्ज करतेवेळी दिलेल्या जानकारी चा सर्व पुरावा घेऊन वेरिफिकेशन कमिटीकडे जायचे असते त्यामध्ये तुमचे ओरिजनल कागदपत्र आणि दोन सेट झेरॉक्स तयार करून घेऊन जायचे असते. चुकीची माहिती अर्जामध्ये दिली असेल किंवा जी माहिती तुम्ही दिली आहे त्याला प्रमाणित करणारे पुरावे तुमच्याजवळ नसतील तर तुमचं ऍडमिशन रद्द केल्या जाते आणि जरी का ऍडमिशन रद्द केल्या गेले किंवा काही कारणास्तव तुम्ही हे ऍडमिशन घेतले नाही तर पुन्हा तुम्हाला आर टी ई 25% आरक्षण योजनेचे लाभ घेता येणार नाही. या योजनेचे लाभ फक्त एकदाच घेता येते. आर टी ई अंतर्गत घटस्फोटीत, विधवा किंवा अन्य काही कारणाने महिला एकटीच पालक असेल तर तीला प्राधान्य दिले जाते. त्याकरीता अर्ज भरते वेळी अर्जामध्ये नोंदवीने गरजेचे असते. अशा प्रकारच्या घटनांमध्ये महिलांच्या माहेरचे दस्तावेज सुद्धा व्हेरिफिकेशन कमिटी मान्य करतात. कारण अनेकदा असे असते की, घटस्फोटीत महिलांचे दस्तावेज नवऱ्याकडून न मिळाल्याने त्यांच्याजवळ पूरक पुरावे नसतात आणि म्हणून त्यामुळे बाळाचा नुकसान होऊ नये म्हणूनच अशा प्रकरणांमध्ये महिलांना सूट भेटत असते. प्रत्येक पुराव्या करिता वेगवेगळे विकल्प दिले जाते त्यापैकी कोणतेही एक तुम्ही देऊ शकता. सध्या शाळेचे पंजीकरण सुरू आहे आणि त्यानंतर पालक गणांसाठी ऑनलाइन पोर्टल वर अर्ज भरणे सुरू करण्यात येईल. कारण जोपर्यंत शाळेचे पंजीकरण होणार नाही तोपर्यंत आपणाकरिता अर्ज भरतेवेळी शाळांचे नाव दिसणार नाही तर आपण अर्ज कसे भरणार म्हणूनच जेव्हा शाळेचे पंजीकरण पूर्णपणे संपून जातील तेव्हाच आपल्या करिता पोर्टल उपलब्ध करून देण्यात येते. दिलेल्या माहिती व्यतिरिक्त जर आणखी काही प्रश्न तुमचा मनात असतील किंवा काही गोष्टींवर तुम्हाला आणखी काही जानुन घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही मला कॉल किंवा व्हाट्सअप करू शकता.

श्वेता एस.

(सामाजिक कार्यकर्ता)

Copyright ©