यवतमाळ राजकीय

महिलांनी संघटित होऊन काम करणे काळाची गरज-प्रा मिनाक्षि सावळकर

महिलांनी संघटित होऊन काम करणे काळाची गरज-प्रा मिनाक्षि सावळकर

13 मार्च 24 निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभाग आणि यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 मार्च 2024 रोजी आदिवासी सोसायटी आदिवासी समाज मंदिर येथे भव्य दिव्य महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सौ कल्पना मांगुळकर उद्घाटक डॉ प्रा सुधाताई खडके *प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लोकनेते सन्माननीय बाळासाहेब मांगुळकर प्रमुख मार्गदर्शिका डॉ प्रा मीनाक्षी सावळकर निराधार निराश्रीत व्यक्ती विकास विभाग अमरावती तसेच चंदू भाऊ चौधरी विरोधी पक्ष नेता नगरपरिषद शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी माजी नगरसेविका दर्शना ताई इंगोले ओम तिवारी शहर कोषाध्यक्ष , के कोंडापे ,सौ विद्या पाताल बन्सी निराधार विभागाच्या जिल्हाध्यक्ष सौ सविता चौधरी उपाध्यक्ष विद्या परचाके सचिव कल्पना नागभिडकर सौ सरस्वती ठाकूर सचिव रंजना वाघाडे उपाध्यक्ष शहराध्यक्ष चव्हाण ताई सौ अमुता तिवारी सौ सीमा चौधरी यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये मा जिजाऊसाहेब, पहिल्या अध्यशिक्षिका सावित्रीबाई देशाच्या पहिल्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवले ला असताना महिलांच्या सत्कार शाल श्रीफळ आणि साडी चोळी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये विविध योजनेची माहिती देण्यात आली, धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांना आरोग्याकडे दुर्लक्ष होते. हे पाहून महिलांच्या आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये आरोग्य तपासणी करून त्यांना आपल्या आजाराबद्दल माहिती देण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये कर्तव्यदक्ष महिलांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलाही कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे. हेच पाहून सर्व महिलांना एकत्रित करण्याचे ध्येय हे आम्ही ठरवलं आणि त्याचीच वाटचाल म्हणून आदिवासी सोसायटीमध्ये सर्व आदिवासी महिला सोबत हा कार्यक्रम घेण्यात आला यांचा साडी आणि चोळी देऊन सन्मान करण्यात , विशेष मार्गदर्शन डॉ प्रा सुधा खडके मॅडम यांनी केले असून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लोकनेते सन्माननीय बाळासाहेब जी मांगुळकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले . महिलांना जागतिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या विरोधी पक्ष नेता नगरपरिषद शहराध्यक्ष सन्माननीय चंदू भाऊ चौधरी यांनी सुद्धा या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन केले, जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या , ओम तिवारी यांनी सुध्दा मागदर्शन केले , या कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांना त्यांनी केलेल्या कर्तुत्वाचा गौरव करून आणि अडचणीला काँग्रेस पक्ष आपल्या सोबत आहे.व सर्वांना साडी चोळी देऊन त्यांचा मान सन्मान करण्यात आला व व कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे संचालन डॉ प्रा मिनाक्षि सावळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन चंदुभाऊ चौधरी यांनी केले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या ज्या व्यक्तींनी मदत केली त्या त्या सर्व व्यक्तीचे संघटनेकडून धन्यवाद ही बातमी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष निराधार विभाग काँग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हा विद्या पाताल बन्सी यांनी कळविली आहे.

Copyright ©