यवतमाळ राजकीय

समान अधिकार या तत्वावर लोकसभा निवडणुक लढणार

समान अधिकार या तत्वावर लोकसभा निवडणुक लढणार

शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे

इंडिया आघाडी व महाविकास आघाडी हे या देशाचे मालक नाहीत. ते ठरवतील त्याच उमेदवाराला मदतान करावे लागेल या भ्रमातुन मतदारांनी लगेच सुटका घेवुन स्वतःच्या मर्जीतल्या उमेदवाराला मतदान करण्याचे आव्हाण.

होवु घातलेल्या सन २०२४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झालेला असतांना इंडिया आघाडी व महाविकास आघाडी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम चालवित असून मतदारामध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचा आरोप संघटनेचे प्रणेते भाई जगदिशकुमार इंगळे यांनी जाहिर केला असून मतदारांना इंडिया आघाडी व महाविकास आघाडी यांच्या भ्रमात न राहता भारतीय संविधानाने करोडपती रोडपती समान अधिकार देशातील नागरीकांना दिलेला आहे म्हणून संविधानाने दिलेल्या समता-स्वातंत्र्य, बंधुत्व या तत्वावर लोकसभा निवडणुक लढण्याचा निर्णय संघटनेने घेतला असून इंडिया आघाडी व महाविकास आघाडी या देशाचे मालक नाहीत, ते जो उमेदवार ठरवतील त्याच उमेदवारांला मतदान करावे लागते हा चुकीचा भ्रम असून मतदारांना ते संभ्रमात पाडत आहे. म्हणून मतदारांने कोणत्याही संभ्रमात न राहता स्वतःच्या मर्जीतल्या उमेदवाराला मतदान करण्याचे आव्हाण भाई इंगळे यांनी केले..

पुढे पत्रकारांशी वार्तापाल करतांना भाई इंगळे म्हणाले की, इंडिया आघाडीमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट) शिवसेना (उबाठा) व काँग्रेश पक्ष आणि सदर पक्षाचे नेते अब्जोधिश आहेत. तरी सुध्दा आघाडी करून जागा वाटप करून निवडणुक लढवतात, म्हणजे पक्ष जरी त्यांचा असला, मतदार हे त्याची मक्तेदारी नाहीत, मतदार हा प्रामाणिकपणे मतदान करीत असतो. परंतु सन २०१९ च्या निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीला भरघोष मतानी निवडून दिले परंतु सत्तेसाठी हापापलेपणा असणाऱ्यांनी राजकारणाचा सत्यानाश करून एकदा मतदारांच्या भरोश्यावर निवडून जायाचे मग सत्तेसाठी गुवाहटीत जावुन “काय डोंगर, काय झाडी, काय हॉटेल एकदम ओके” राहून मतदारांचे काहीच घेणे-देणे नाही असल्या राजकिय पक्षाला आता जनता कंटाळली असून, गटातटाच्या राजकारणी राज्यकर्त्यांला जनता मतदान करणार नाही, म्हणून “चार वर्ष अकरा महिने १५ दिवस” सतत संघर्ष करणाऱ्या सामाजीक संघटनेच्या कार्यकर्त्यांच राजकिय पुर्नसवन करणाऱ्यासाठी सामाजीक संघटनेच्या कार्यकर्त्याच राजकिय पुर्नवसन व्हावे या करीता सन २०२४ च्या लोकसभा निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा दलित पँथरचे केंद्रिय कार्याध्यक्ष तथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे यांनी केली.

Copyright ©