Breaking News विदर्भ सामाजिक

देवळी एम.आय.डी.सी.परिसरातून भंगार भरलेला ट्रक चोरी.

 

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे

रविवारी रात्री ११ वाजताच्या दरम्यान एम.एच.४० बी.जी.६७८३ क्रमांकाच्या ट्रकमध्ये ल्यांको कंपनी मांडवा येथून २० टन ३०० कि.भंगार भरून एक महालक्ष्मी टी एम टी कंपनी देवळी येथे आणून उभा केला होता व चालक जेवणाकरिता कंपनी समोर असलेल्या ढाब्यावर गेला होता हीच संधी साधून एका अज्ञात नेहारे नावाच्या आरोपीने ट्रक चोरून नेला अशी फिर्यादि ट्रक चालक दिनेश कुमार किसनलाल टेंभर राहणार पार्डी नाका नागपूर याने देवळी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे.
फिर्यादीचा ट्रक ४ लाख रुपये व भरून असलेल्या भंगार ची किंमत ७ लाख रुपये ऐकून ११ लाख रुपयांचा माल चोरी गेल्याचे फिर्यादीने आपल्या तक्रारीत सांगितले आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून देवळी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.

Copyright ©