Breaking News विदर्भ सामाजिक

अकाळी पावसाचा देवळी तालुक्याला तडाखा.

 

वादळी वाऱ्यासह रात्रभर पाण्यात कडकडल्या विजा

अनेक ग्रामीण भागात रस्त्यावर पडले झाडे अनेकांच्या घरांचे उडाले छत

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे

देवळी तालुक्यात बुधवार रात्री ८ वाजता पासून वादळी वाऱ्यासह रात्रभर पाण्याने थैमान घालून आकाशात विजा कडकल्या त्यामुळे देवळी तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात रस्त्यावरील झाडे वादळी वाऱ्याने भुई सपाट झाली व तालुक्यातील अनेक ग्रामीण क्षेत्रात लोकांच्या घरांचे छत सुद्धा वादळी वाऱ्याने उडाली आहे अशी माहिती प्राप्त झाली.
देवळी तालुक्यातील वाफगाव,अंदोरी,बोपापूर(दिघी) सैदापूर,गंगापूर,खर्डा,अडेगाव, वाटखेडा,टाकळीचणा,सोनेगाव बाई, अशा अनेक ग्रामीण भागामध्ये लोकांच्या घराचे वादळी वाऱ्याने नुकसान झाले आहे तसेच अनेक झाडे या मार्गावरील रस्त्यावर पडल्याने या ग्रामीण भागाची वाहतूक विस्कळीत झाल्याची कळते,रात्रीच्या वेळेस येणाऱ्या मोठ्या वाहनांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागे रात्री झालेल्या या वादळी पावसाची नुकसानाची माहिती देवळी तहसील कार्यालयास विचारल्यास अशी माहिती मिळाली की अजून पर्यंत झालेल्या नुकसानाची माहिती आमच्याकडे सध्या उपलब्ध नाही आमचे अधिकारी याविषयी माहिती घेण्यासाठी ग्रामीण भागाच्या संपर्कात आहे असे सांगण्यात आले.

Copyright ©