Breaking News राजकीय विदर्भ

देवळी तालुक्यात काँग्रेसचा उडाला गुलाल

 

भाजपा भोपळा फोडण्यात अपयशी

काँग्रेस व सहकार गट समर्थित शेतकरी सहकारी एकता पॅनल चा दणदणीत विजयी

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे

देवळी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुलगाव उप बाजार समिती देवळी वर मागील अनेक वर्षापासून काँग्रेस तसेच सहकार पॅनल समर्थित गटाचा एकतर्फी वर्चस्व राहिलेले आहे.२८ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल लागला त्यामध्ये काँग्रेस व सहकार गट समर्थित शेतकरी सहकारी एकता पॅनल चा दणदणीत विजय झाला या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने ही जबरदस्त तयारी केली होती मागील अनेक वर्षापासून भोपळा फोडण्याची तयारी केली होती परंतु भाजपा नेत्याच्या या प्रयत्नाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदारांनी पूर्णपणे नाकारले आणि यावेळी सुद्धा भाजपा ही कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणुकीत भोपळा फोडण्यात अपयशी ठरले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस व सहकार गट समर्थित निवडून आलेले उमेदवार मनोज वसू, प्रमोद वंजारी,रवींद्र चौधरी,मनीष खडसे,संजय गावंडे,अरविंद वानखेडे, संजय बोबडे,सौ अश्विनी अडकिने,मनीषा भामरखेडे,संजय कामनापुरे,अरुण माहुरे,जयकुमार वाकडे,अमर तीनघसे,डॉ मिलिंद ठोंबरे,अशोक आडबेले,हरीश कुमार ओझा,तसेच अविरोध निवडून आलेले बहादुर चौधरी इत्यादी उमेदवार निवडून आले आणि पुन्हा काँग्रेस व सहकार गटाची सत्ता कृषी उत्पन्न बाजार समिती पुलगाव उप बाजार समिती देवळीवर स्थापित झालेली आहे.

Copyright ©