Breaking News विदर्भ सामाजिक

एका आठोड्यापासून बी.एस.एन.एल ची सेवा बंद

 

बँकिंग सेवा,मोबाईल ग्राहक,यांना होत आहे त्रास

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे

एका काळात भारतातील सर्वात उत्तम मोबाईल नेटवर्क शासकीय कंपनी भारतीय दूरसंचार निगम(बीएसएनएल )ही नेटवर्क सेवा देण्याबाबत सर्वात उत्तम कंपनी होती. परंतु देवळी शहरांमध्ये मागील एका आठोड्यापासून बीएसएनएल दूरसंचार कंपनीचे नेटवर्क पूर्णपणे ठप्प पडलेले आहे.त्यामुळे शहरातील बँकिंग सेवा,व बीएसएनएलचे ग्राहक पूर्णपणे त्रस्त झालेले आहे.याविषयी बीएसएनएलचे कर्मचारी त्यानंच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरवर वीज पडल्याने शहरातील नेटवर्क सेवा बंद झालेली आहे.आमचे कर्मचारी मागील एका आठोड्यापासून या टॉवरचे काम करीत आहे परंतु अजूनपर्यंत त्रुटी सापडलेली नाही त्यामुळे केव्हा मोबाईल नेटवर्क सुरू होईल याची शाश्वती नाही.
आधीच बीएसएनएल कंपनीचे पाय डोहात गेलेले आहे.त्याचवरून पुन्हा एक आठोड्यापासून देवळी शहरात मोबाईल नेटवर्क ची सेवा विस्कळीत झालेली आहे.आणि कंपनीचे अधिकारी यांना अजून पर्यंत मोबाईल टॉवर वर कुठे त्रुटी आहे हेच सापडले नाही देव जाणे या कंपनीचे काय होईल?आता नागरिक असे म्हणू लागलेले आहे.शासनाने याकडे लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांना याविषयी विचारणा करून देवळीतील बीएसएनएलची सेवा पूर्वीप्रमाणे सुरू करावी तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई सुद्धा करावी अशी मागणी बीएसएनएलच्या नेटवर्क सेवा घेणारे ग्राहक करीत आहे.

Copyright ©