सुनिल चव्हाण यांच्या गायनाने कार्यक्रमच बहरला
राहील दादा मित्र परिवार जवळा. याच्या वतीने दि.03 डिसेंबर 2023 ला भव्य अशी राज्य स्तरीय एकल नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .या स्पर्धेत पुणे.नागपूर. वर्धा.यवतमाळ.कारंजा बऱ्याच दूर वरच्या कलाकारांनी भाग घेतला होता तर हजारोच्या संख्येने रसिक बांधवांनी या कार्यक्रमाचा मनमुराद असा आनंद घेतला .या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून साऊथ फिल्म इंडस्ट्री चे डायरेक्टर फहीम सरकार हैद्राबाद तर माळेगाव तह.आर्णी येथील गायक तथा सिनेकलावंत सुनिल रामचंद्र चव्हाण यांना निमंत्रित केले होते मान्यवरांच्या हस्ते फहीम सरकार आणि सुनिल चव्हाण यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .सुनिल चव्हाण यांनी स्त्री आणि पुरूष च्या आवाजात गायन करून कार्यक्रमच बहरून टाकला हे विशेष
Add Comment