महाराष्ट्र यवतमाळ

अवैध रीतीचा ट्रॅक्टर सेटलमेंट करून सोडला हिवरी वनपरिक्षेत्रातील रुई क्षेत्र सहायकाचा प्रताप

अवैध रीतीचा ट्रॅक्टर सेटलमेंट करून सोडला हिवरी वनपरिक्षेत्रातील रुई क्षेत्र सहायकाचा प्रताप

यवतमाळ तालुक्यातील रुई( वाई )बोरी गोसावी मंगरूळ गणगाव या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक केली जाते या वाहतुकीमुळे सर्वसामान्य जीवाला कित्येकदा धोका किंबहुना अपघात सुद्धा झाले आहे परंतु या गंभीर बाबीकडे यवतमाळ ग्रामीण पोलिसांसह महसूल विभागाचे आर्थिक हितसंबंध असल्याची ओरड सर्वसामान्य जनतेकडून केल्या जात होती.यात वनविभाग हि मागे राहिला नसल्याने सर्व सृत झाले,कारण असाच प्रकार आज हिवरी येथील वनपरिक्षेत्र चे पथक गस्तीवर असताना रुई मार्गे वाट खेड हिवरी या भागात एक ट्रॅक्टर रेतीची वाहतूक करताना दिसला त्याला अडवून कोणतेही कारवाई न करण्यासाठी वनविभागाच्या रुई बीट मधील क्षेत्र सहाय्यक यांनी तब्बल पन्नास हजार रुपयाची मागणी केली तेव्हा तीस हजार रुपयात सेटलमेंट करण्यात आले या वेळी एक महिला वनरक्षक व तिचे पती सोबत होते तर 20 हजार नगदी दिले आणि 10 हजार नंतर देण्याचे आश्वासन दिले ट्रॅक्टर सोडण्यात आला ही माहिती वाऱ्यासारखी पूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पसरली वनविभागाच्या रुई बीडचे वनपाल जाधव यांना विचारणा केली असता प्रथम दर्शनी माहित नसल्याचे सांगून याची माहिती नंतर देतो म्हणून मोबाईल बंद केला तर वनरक्षक मिरासे नामक महिला कर्मचारी यांनी सुद्धा नंतर माहिती देण्याचे सांगून टाळले, त्यानंतर या पथकाने या प्रकरणात वनपाल वनरक्षक चौकीदार सह भागी होते रुई बीटमध्ये अवैध रेती वाहतूक धारका कडून हप्ता घेत असल्याने जंगला मधून खुले आम रेती तस्करी होत आहे येथील विविध कामांना उधान आले आहे हिवरी वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या बीटमध्ये गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणात दगडी बांध वन तलाव वनराई बंधारे अशी विविध प्रकारची कामे केली गेली मात्र एकही काम सुव्यवस्थित व निकृष्ट दर्जाचे असल्याचे सर्वत्र चर्चेचा विषय आहे तर काही कामे न करता बिले हि काढण्यात आले त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन संबंधित रुईचे क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©