माऊली इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न
कळंब तालुक्यातील जोडमोहा येथील माऊली इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन शाळेच्या मैदानावर दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भारतीय संस्कृती या विषयावर विविध नृत्याविष्कार नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीची ओळख करून सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केले चिमुकल्या मुलांची वेशभूषा हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले व विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
शिक्षणाबरोबरच मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी माऊली इंग्लिश मीडियम स्कूल जोडमोहा विविध कार्यक्रम आयोजित केले असून यातील वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सतीश देशमुख सर, प्रमुख अतिथी लिल्हारे सर, प्रमुख पाहुणे पत्रकारशक्ती संपादक पवन धोत्रे,माझी सरपंच जोडमोहा रेशमाताई लिल्हारे,नितीन गिरी,उपस्थिती लाभली. शिक्षक-पालक मुख्याध्यापिका रुचिका मेश्राम मॅडम, शिक्षिका भाग्यशाली रोठे,कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुचिका मेश्राम मॅडम,तर आभार प्रदर्शन भावना मिसाळ मॅडम, यांनी केले. यावेळी मुकेशभाऊ लिल्हारे, रुपेश कुकुलवार, विजू लिल्हारे, सुभाष देवकर, युराज जाधव, अशोक शिवणकर, पालक वर्ग उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडले
Add Comment