यवतमाळ राजकीय

प्रहार जनशक्ती पक्षाचे तहसीलदार यांना निवेदन

प्रहार जनशक्ती पक्षाचे तहसीलदार यांना निवेदन

कळंब तालुक्यातील दिव्यांग, विधवा महीला, शेतकरी, वृध्द तसेच सर्व सामान्य कुटुंबांना मिळणाऱ्या योजनांसाठी तसेच दिव्यांग बांधवांच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी नियुक्ती करण्यात यावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष कळंब च्या वतीने प्रहार युवा उपाध्यक्ष ऋतिक भोंगाडे याच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली.

बऱ्याचशा विधवा महीलांना तसेच दिव्यांग व्यक्तींना तसेच वृध्दांना अंत्योदय अन्नधान्य योजना, निराधार योजना मिळत नसुन त्यांना या योजनेचा त्वरित लाभ देण्यात यावा. तसेच दिव्यांग व्यक्तींच्या समस्या तसेच मागणी दिवसेंदिवस वाढत असून त्यासाठी दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी, ग्रा.पं चा 5% निधी वितरीत करण्यात यावा, दिव्यांग प्रमाणपत्र कळंब ग्रामीण रुग्णालय येथे सुध्दा वितरीत करण्यात यावे, अशी विशेष मागणी होती.

कळंब तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नसुन त्यासाठी संबधित विभागाला आदेश देऊन त्या शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात यावा यासाठी सुध्दा त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

दिव्यांग व्यक्तींना,तसेच अनेक गरीब कुटुंबांना ,विधवा महिलांना घरकुल योजनेसाठी प्रतिक्षेत न ठेवता त्यांना त्वरित घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा या सर्व योजनेच्या लाभासाठी तसेच मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष कळंब च्या वतीने प्रहार तालुका अध्यक्ष दिलीप डवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रहार युवा उपाध्यक्ष ऋतिक भोंगाडे याच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदन प्रसंगी प्रहार सामाजिक कार्यकर्ते प्रविण ढाकुलकार, प्रहार तालुका सचिव बंडु वाघाडे, विपुल सक्रापुरे, विरेंद्र चव्हाण, बलीचंद कोळझरे,निलेश राठोड, पवन जाधव तसेच तालुक्यातील अनेक दिव्यांग व्यक्ती, विधवा महीला, वृध्द तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते.

Copyright ©