यवतमाळ येथील शिवाजी नगर मैदानात घुमले जीवन विद्येची विचार
55 व्या ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळ्याच्या निमित्ताने थोर तत्वज्ञ व विचारवंत सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जीवन विद्येवरील समाज प्रबोधन महोत्सव आज उत्साहात पार पडला.
आज सोहळ्याचा पहिला दिवस होता. त्यावेळी यवतमाळकर वासियांनी प्रचंड प्रतिसाद देत हा कार्यक्रम संपन्न केला.
प्रथमता ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ सुस्वर पद्धतीने घेण्यात आला. त्यावेळी मुंबईतील अनेक नामवंत गायक उपस्थित होते. त्यांनी उपस्थित रसिकांची मने जिंकली. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळ्याच्या निमित्ताने अभंग गायन करून वातावरण गंधित करण्यात आले. सर्व यवतमाळ वासियांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यवतमाळचे लोकप्रिय सन्माननीय आमदार मदनभाऊ येरावार यांच्या वतीने श्री प्रल्हाद वामनराव पै यांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांना प्रल्हाद वामनराव पै यांनी सुखी जीवनाची गुरुकिल्ली देणारे मौलिक विचार मांडले. आणि ते लोकांना खूपच भावले.या सोहळ्यास यवतमाळ मधील अनेक मान्यवर, समाजसेवक, डाॅक्टर,उद्योजक,तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
सर्वांच्या प्रतिक्रिया पाहता हा कार्यक्रम सर्वांना प्रचंड आवडला.श्री प्रल्हाद दादांनी सुखी जीवनाची गुरुकिल्ली हातात देताना सहनशीलता, समाधान व सेवाभाव या वृत्तीने जीवनात कसे वागावे ते सांगितले. त्याचप्रमाणे पैसा मिळवताना सुद्धा योग्य मार्गाने तो मिळवल्यास आपल्याला जीवनात सुख, शांती, समाधान मिळते हा विषय विषद केला.
आज रविवार दिनांक २८|१|२०२४ रोजी सायंकाळी ४.३० ते ८ यावेळेत सर्वात श्रेष्ठ राष्ट्रहीत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तरी समस्त यवतमाळ वासियांना विनंती आहे, आपण मोठ्या संख्येने या सोहळ्याचा लाभ घ्यावा व आपले जीवन सुखी करावे.
Add Comment