यवतमाळ सामाजिक

  ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करा!

  ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करा!

हिंदू जनजागृती समितीचे पोलीस, प्रशासनाला निवेदन !

यवतमाळ,- व्हॅलेंटाईन डे च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी,या मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय येथे 6 फेब्रुवारी या दिवशी देण्यात आले.

गेल्या काही वर्षात 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याची पश्चिमात्त्यांची कुप्रथा भारतातही रूढ झाली आहे,पाश्चात्यानी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवापिढी भोगवाद अन अनैतिकता यामध्ये ओढली जात आहे, व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे बिभस्त सादरीकरण करत हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्य घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, तसेच या दिवशी होणाऱ्या पार्ट्यांमधून युवक युवती यांच्यात मद्धपान, धूम्रपान, अमली पदार्थाचे सेवन आदि अपप्रकारात प्रचंड वाढ झाली आहे, इतकेच नव्हे तर या दिवशी संतती प्रतिबंधक साधनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होते, हे या दिवशी होणाऱ्याअनैतिक संबंधातील वृद्धी दर्शवते , तसेच या दिवशी मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी भर्गाव वेगाने वाहने चालवल्याने अपघातही होतात, काही धर्मांध युवक हे युवतींना खोटी नावे सांगून त्यांना लव्हजिहाद ला बळी बनवतात. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी शाळा परिसरामध्ये तेथे कायदा सुव्यवस्था तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहेत, याचा अतिरिक्त ताण पोलीस प्रशासनावर येत आहे. सद्यस्थितीत भारतात प्रति 16 मिनिटाला एक बलात्कार होत आहे हे भयावह आहे. भारतीय समाजव्यवस्था उत्तम राहावी आणि अनैतिक कृत्यामुळे होणाऱ्या अपप्रकारांना आळा बसावा यासाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासह युवा पिढीचे प्रबोधन करण्याची ही आज नितांत आवश्यकता आहे, यासाठी 14 फेब्रुवारी या दिवशी पोलिसांची विशेष पथके, गस्तीपथके शाळा महाविद्यालय परिसरामध्ये नियुक्त करावी, तसेच समाजकंटकांना ताब्यात घेणे,वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करणे तसेच शाळा महाविद्यालय परिसरात असे प्रकार होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचना निर्देशित कराव्यात, महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण पाहता संकटकाळात सहाय्य व्हावे यासाठी युवतींसाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर करावा,

या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उपपोलीस अधीक्षक मनोहर पाटील यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी त्यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेत संबंधितांना सूचना निर्देशीत केल्या.

निवेदन देतांना पतंजली योग पिठाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिनेश राठोड, सनातन संस्थेचे सुधाकर कापसे हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक मंगेश खांदेल ,दत्तात्रय फोकमारे उपस्थित होते.

 

आपला नम्र,

श्री. मंगेश खांदेल

हिंदू जनजागृती समिती

जिल्हा समन्वयक यवतमाळ.

संपर्क – 9767022548.

Copyright ©