यवतमाळ सामाजिक

भटक्या जमाती घरकुला पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

भटक्या जमाती घरकुला पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

वटबोरी गट ग्रामपंचायत सोनखास फाटा येथील स्वतंत्र काळापासून भटक्या विमुक्त जातींना शासनाने आजपर्यंत कोणताही लाभ दिलेला नाही नुकतेच भटक्या जमातीने करिता घरकुल घरकुल योजना राबविण्यात आली आहे परंतु ही घरकुल योजना घेण्यात करिता ग्रामसेवक गटविकास अधिकारी विविध कारणे देऊन भटक्या जमातींना घरकुलापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याने याबाबत जिल्हा अधिकारी यांचे कडे निवेदन देण्यात आले याची तातडीने दखल जिल्हाधिकारी यांनी घेतली असून कळम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना त्वरित तपासणी करून घरकुल देण्याचे आदेश देण्यात आले आहे याप्रकरणी ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक वैशाली थूल ह्या आपली मनमानी करीत असल्याने घरकुल लाभार्थ्यांना टाळाटाळ करीत असल्याचीही जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या निदर्शनास आणून दिले यानंतर आपणास सहकार्य न केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असे आश्वासनही जिल्हाधिकारी यांनी दिले हे निवेदन संभाजी ब्रिगेडचे सुरेश खोब्रागडे, गरिबा धराडे, प्रथमेश घाटोळ, छाया मांढरे ,सुनंदा धराडे, दीक्षा पवार, सुरेखा काकडे, सावित्री लोणकर, वनिता लोणकर, नीताताई भड दुर्गाताई मांढरे, शितलताईकाकडे, भुलाताई शिवणकर, रमेश घाटोळ ,अनिताताई पवार, सुरेश भड व रवी काकडे इत्यादीनी निवेदन दिले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©