यवतमाळ राजकीय सामाजिक

मारोती गिट्टी स्टोन क्रेशर ला कंटाळून शेतकऱ्यांचे तहसीलदार तसेच जिल्हा अधिकारी यांना निवेदन

मारोती गिट्टी स्टोन क्रेशर ला कंटाळून शेतकऱ्यांचे तहसीलदार तसेच जिल्हा अधिकारी यांना निवेदन

कळंब तालुक्यातील जोडमोहा रोडवरील हिरडी गावाजवळ असलेल्या मारोती गिट्टी स्टोन क्रेशर जवळ असलेल्या शेतकऱ्यांना तसेच गावांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहेत. भरदिवसा होणाऱ्या ब्लास्टिंग मुळे हिरडी, शिवणी खुर्द तसेच वाढोणा येथील गावकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहेत. तसेच ब्लास्टिंगमुळे लहान मोठे दगड शेतात येत असून, शेतातील मजुरांना अपघात होण्याची शक्यता आहे.

अनेक शेतकऱ्यांच्या विहीरी खचल्या असुन क्रेशर येथील धुरामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात अवैध प्रकारे बळजबरीने मुरूम टाकला जात आहेत, तर काहींच्या शेतांमधून जबरदस्तीने रस्ता करण्यात येत आहे. क्रेशरच्या खोलीकरणाची मर्यादा संपली असुन तरीसुद्धा अवैधरित्या प्रशासनाच्या मदतीने तसेच लोकप्रतिनिधींच्या सहाय्याने काम चालू आहेत असे सर्व शेतकऱ्यां मध्ये चर्चा होत आहे

वरील सर्व समस्या नायब तहसीलदार कळंब थुल तसेच उपजिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या निदर्शनास आणून दिली असून, त्वरित यावर कार्यवाही करून चौकशी करण्यात येईल असे सांगण्यात आले, हे निवेदन देतांना प्रहारचे युवा उपाध्यक्ष ऋतिक भोंगाडे तसेच किसन डेबूर, दशरथ डेबूर, कवडू डेबूर, वासुदेव भोंगाडे, मुकेश भोंगाडे, विष्णू डेबूर, श्रावण डेबूर, रामभाऊ डेबूर, अरूण लिल्हारे, चंद्रकला डेबूर, भाऊराव कालोकार, शंकर वरझडकर, किसन लिल्हारे, मंदा मोकाशे, नारायण मलांडे, इ. शेतकरी उपस्थित होते.

Copyright ©