यवतमाळ राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद शिंदे

यवतमाळ प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद शिंदे

शिवसेनेला केला अखेरचा जय महाराष्ट्र

गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेनेत असलेले तसेच विविध पदे भुषविलेले प्रमोद शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत नागपूर येथे शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य ओबीसी चे प्रदेशाध्यक्ष कल्याण रावजी आखाडे यांच्या आदेशाने प्रमोद शिंदे यांची नियुक्ती यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष म्हणून करण्यात आली. सदर नियुक्तीचे पत्र हे यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक तथा वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या हस्ते सौ. क्रांती राऊत महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, बाळासाहेब कामारकर जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच महाराष्ट्र राज्याचे ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष राजु गुल्हाने यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. सदर नियुक्ती चे श्रेय जिल्ह्याचे नेते आमदार इंद्रनील नाईक, श्री वसंतराव घुईखेडकर, तारीक लोखंडवाला, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष क्रांती धोटे राऊत, प्रदेश सरचिटणीस विवेक देशमुख यवतमाळ राष्ट्रवादी शहर अध्यक्ष लाला राऊत यांना देतात. यावेळी युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष योगेश धानोरकर महिला जिल्हाध्यक्ष सुनयना येवतकर, विलास ठाकरे, प्रदीप ढाले, हितेश खानपाडा, नयन लुंगे, आशिष मोघे, आकाश चंदनखेडे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या माध्यमातून ओबीसी समाजाचे तसेच विद्यार्थ्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रमोद शिंदे यांनी सांगीतले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©