यवतमाळ राजकीय

हिवरी अकोला बाजार सर्कल मध्ये शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप 

हिवरी अकोला बाजार सर्कल मध्ये शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

वंदनीय हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त व संत शिरोमणी श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत हीवरी – अकोलाबाजार सर्कल मधील कोळंबी, बारड गाव, बारड तांडा, बोरीसिह, सायखेडा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत दिनांक 20.फेब्रुवारी 2024 रोजी शालेय साहित्य यांचे वितरण शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यवतमाळ विधानसभा यांच्यातर्फे करण्यात आले.

या वेळी शाळेतील उपस्थित विध्यार्थी यांना शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष ढवळे यांनी संवाद साधत मार्गदर्शन केले.

आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर मेहनत घेतल्यास कुठलेही स्वप्न अपूर्ण राहणार नाही असे संतोष ढवळे म्हणाले.

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कुठलीही मदत लागल्यास शिवसेना यवतमाळ विधानसभा तुमच्या सदैव पाठीशी असेल असे संतोष ढवळे यांनी आश्वस्त केले.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी जय महाराष्ट्र म्हणुन शालेय परिसर दणाणून सोडला.

या शालेय नोटबुक वाटप प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, उपतालुकप्रमुख गजानन पाटील, बाजार समिती संचालक संजय राठोड, विभागप्रमुख गणेश आगरे, गणेश आगलावे, शाखाप्रमुख श्रावण वाघाडे, अक्षय ठाकरे, उपसरपंच दिनेश चव्हाण, दिनकर भवरे, संजय मोहोड, भूषण राठोड, अगलधरे काका, ईश्वरलाल जयस्वाल, आदी उपस्थित होते.

Copyright ©