यवतमाळ सामाजिक

रस्ता चुकलेल्या वयोवृद्ध आजीला सुखरूप पोहचवले नातवा जवळ

रस्ता चुकलेल्या वयोवृद्ध आजीला सुखरूप पोहचवले नातवा जवळ

यवतमाळ – येथील दारव्हा रोड वर एक वयोवृद्ध महिला कुबडे निघालेली, शरीराने कमजोर झालेली वय अंदाजे ७० ते ७५ वर्ष नाव बेबीबाई इकडे तिकडे भांबावून फिरताना एका चहाकॅन्टीन चालवणाऱ्या जागरूक नागरिक विजय नेवारे नामक व्यक्तीस आढळली त्यांनी तिची विचारपूस करून चौकशी करण्याचा प्रयत्न केला परंतु वयोवृद्ध आजीचे बोलणे वृद्धापकाळाने व भेदरलेल्या अवस्थेत असल्याने बोलणे थोडे वेगळेच झाले होते, चहाकॅन्टीग चालक यांनी संकल्प फाऊंडेशनचे सेवक निलेश ठोबरे यांना बोलावून त्या आजीला मदत करावी असे विनवणी करून बोलावून घेतले, निलेश ठोबरे यांनी पोहोचल्या बरोबर आजीला नाष्टा, चहापाणी, उसाचा रस दिला, ठोबरे यांनी देखील आजीला विचारपूस केली परंतु यांना देखील त्या आजीचे वृद्धापकाळ बोलणे समजत नव्हते त्यांनी म्हाताऱ्या आजीला मदत मिळावी इतर समाज सेवकांना फोनकरून आजी संदर्भात माहिती देऊन आजी असलेल्या ठिकाणी येण्यास सांगितले पण मदत करण्यासाठी कोणाकडूनही कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद त्यांना इतरांकडून मिळाली नाही, असाच एक फोन नारी रक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष, संकल्प फाऊंडेशन सदस्य सामाजिक कार्यकर्ते विनोद दोंदल यांना केला क्षणाचाही विलंब न करता अवघ्या दहा मिनिटात विनोद दोंदल त्या ठिकाणी उपस्थित झाले, दोंदल यांनी आपलेसे करून आजीला आपल्या विश्वासात घेतले तिच्या तुटक्या फुटक्या बोलणे त्यांनी जाणण्याचा प्रयत्न केला, बोलताना तिच्या तोडून देवळी नाव निघाल्या सारखे झाले, विनोद दोंदल यांनी आजीचा फोटो कडून देवळी येथील परिचयातील मानलेली बहीण माधुरी सेवेकार नामक महिलेच्या फोनवर पाठवला व त्या आजी बद्दल माहिती मिळते का बघण्यात सांगितले, अवघ्या थोड्याच वेळात देवळी येथून माधुरी सेवेकार यांचा फोन आला व त्या इथल्याच आहे, असे सांगून त्या आजीच्या घरी पूर्ण माहिती सांगण्यास आली.

सदर वयोवृद्ध महिला ही वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील असून, तिचे नाव बेबीबाई आपल्या पती रमेश मोहोड सोबत यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील एका गावाला जाण्यासाठी निघाले, अशी माहिती देण्यात आली, परंतु कळंब पर्यंत आल्या नंतर त्यांची व त्यांच्या पती यांच्यात चुकामुक होऊन वेगळे झाले, कळंब मध्ये पती पत्नीला शोधा-शोध करायला कामीं लागले, आजीला काहीच समजल्या नसल्याने त्या एकट्याच कळंब, यवतमाळ वरून अमरावती जाणाऱ्या बस मध्ये बसल्या, त्या यवतमाळ मध्ये न उतरता पुढे अमरावती जाण्यासाठी निघाल्या वाहकाच्या सतर्कतेमुळे लक्षात येताच त्या आजीला यवतमाळ मधील दारव्हा रोड वर दुपारी दोन वाजता उतरवून दिले, ती मग आहे चहाकॅन्टीन चालकास नजरेत पडली, सायंकाळी सहा वाजेपर्यंत इकडे तिकडे माहिती घेऊन शेवटी यवतमाळ मधील आजीच्या नातवाचा पवन माळोदे यांचा मोबाईल नंबर मिळाला विनोद दोंदल यांनी पवन माळोदे यांना फोन करून माहिती देण्यात आली, त्यांना सर्व घडलेले प्रकरण सांगून बोलावून घेऊन आजीला सुखरूप नातवाच्या स्वाधीन करण्यात आले, या सर्व मदत कार्यात विनोद दोंदल, निलेश ठोबरे, विजय नेवारे व देवळी येथील माधुरी सेवेकार यांनी अथक परिश्रम घेऊन एका वयोवृद्ध आजीला तिच्या नातवाच्या स्वाधीन केले, या केलेल्या कार्य बद्दल त्यांचे सर्वत्र वाहवाई व कौतुक होत आहे.

Copyright ©