महाराष्ट्र सामाजिक

ओझरच्या बोरस्ते विद्यालयात नांदी फाउंडेशन पुणेच्या वतीने बक्षीस वितरण

ओझरच्या बोरस्ते विद्यालयात नांदी फाउंडेशन पुणेच्या वतीने बक्षीस वितरण

प्रशिक्षण विद्यालयाच्या परिवर्तनाची नांदी ठरेल- मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांचे प्रतिपादन

नांदी फाउंडेशन पुणे च्या वतीने आयोजित केलेल्या पाच दिवसीय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन केले. विद्यालयाच्या संगीत शिक्षिका शितल आहेर व गीतमंचने स्वागतगीत म्हटले. प्रास्ताविकात पाच दिवशीय कार्यशाळेचा विषय ‘डिजिटल इक्विलायझर्स फॉर गर्ल्स’ यात जीवन कौशल्य संगणक इंटरनेट याविषयी राबविलेल्या उपक्रमांची माहिती भक्ती फडते यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. व्यासपीठावर भक्ती फडते गोवा सोनल रोकडे वर्धा राजश्री ब्राह्मणे पुणे प्रेरणा सूर्यवंशी छ.संभाजीनगर सहाय्यक संदीप घोणसे सुशील मुनेश्वर सुजित घोणसे इंद्रजीत गायकवाड बाळासाहेब ढेपले अरुण सावंत सुनील पाटील नंदकुमार न्याहारकर महेंद्र डांगले मंगल सावंत रेखा देशमाने उपस्थित होते. विद्यार्थी मनोगत राजनंदिनी ठोके अल्फीया शहा कार्तिकी मोरे तेजल शिंदे सारा भोज प्रज्ञा वाव्हळे अलेरा खाटीक गायत्री आहेर यांनी संगणक इंटरनेट वापराबाबत कार्यशाळेतील अनुभव कथन केले. यावेळी कार्य शाळेतील उत्कृष्ट २० विद्यार्थ्यांना ट्रॉफी, १२ स्कूलबॅग्ज व सहभागी १५० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रशिक्षक प्रेरणा सूर्यवंशी यांनी कार्यशाळेत राबविलेल्या उपक्रमांची माहिती देऊन विद्यार्थ्यांचे अध्ययन अनुभव कथन करत मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे मा.उदय देवरे उप-शिक्षणाधिकारी जि प नाशिक यांचे मार्गदर्शन लाभले. नांदी फाउंडेशनच्या झोनल हेड श्रीमती सीमा भागवत आणि प्रोग्राम कॉर्डिनेटर आशा कांबळे यांनी विद्यालयात प्रशिक्षण घडवून आणण्यास सहकार्य केले. नांदी फाउंडेशनच्या सर्व प्रशिक्षकांचा सत्कार मुख्याध्यापक सोपान वाटपाडे व उपस्थित ज्येष्ठ शिक्षकांच्या हस्ते होऊन कार्यशाळेचे अध्ययन व अध्यापन करणारे प्रशिक्षक व विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले. नांदी फाउंडेशन हे प्रशिक्षण विद्यालयाच्या परिवर्तनाची नांदी ठरेल असेही शेवटी त्यांनी सांगितले. या काळात विविध उपयुक्त असे नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवून पाच दिवसीय कार्यशाळेचा समारोप झाला. सूत्रसंचालन भक्ती फडते शितल हांडोरे यांनी केले तर आभार सोनल रोकडे यांनी मानले.

उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा झाला सन्मान

पदक वितरण-

कार्तिकी मोरे तेजल शिंदे कादंबरी धाडदे अंकिता वाघ गौरी काळे सायली जोंधळे तनुजा क्षीरसागर राजनंदिनी ठोके विशाखा जोंधळे अल्फीया शहा खुशाली जाधव नेत्रा ढगे अल्फीच्या खाटीक प्रज्ञा वावळे प्रीती बाविस्कर माधुरी जाधव गायत्री आहेर आर्या भंडारे रोशनी शर्मा रोहिणी कुंदे

स्कूलबॅग्स वितरण-

गायत्री शिंदे ज्ञानेश्वरी शिंदे ईश्वरी सोनवणे विद्या संगमनेरे शामली मंडलिक आरती सोनवणे वैष्णवी माडे स्नेहल गोतरणे विशाखा भडके सोनी लोकबहादुर कावेरी लवांड पल्लवी मोरे वरील विद्यार्थ्यांना नांदी फाउंडेशन पुणे कार्यशाळेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

Copyright ©