यवतमाळ सामाजिक

यवतमाळात वाहतूक शाखेत सिंघम रिटर्न

यवतमाळात वाहतूक शाखेत सिंघम रिटर्न

यवतमाळातील वाहतुकीचा बोजवारा उडाला होता,अनेक वर्षा पासून प्रत्येक रस्त्यावर वाहने ठेवून आपल्या मनमान्या वाढल्याने यवतमाळ कर त्रस्त झाले होते भर रस्त्यात फळ विक्रेते आपल्या गाड्या लाऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता,त्या मुळे वाहतुकीची सतत कोंडी होत होती.वाहतूक शाखा हि नाममात्र असल्याने सर्व सामान्य त्रस्त झाले होते अशातच नव्यानेच ज्ञानोबा देवकते यांनी सन 2017 डिसेंबर मध्ये वाहतूक शाखेचा पदभार स्वीकारला आणि आपली पोलीस गिरी सिंघम स्टाईल मध्ये सुरू केली होती त्या वेळी शहरातील दुकानदाराचे फलक,रस्त्यावर आले होते अनेक दुकानदार आपले साहित्य रस्त्यावर लाऊन आपला व्यावसाय राजरोस पणे सुरू होता त्या मुळे तो रस्ता अतिक्रमणाने व्यापून गेला होता , त्या वेळी हे सर्व अतिक्रमण काढून रस्ता सुटीत करण्याचे काम देवकते यांनी केले आता पुन्हा त्यांनी भर दूपारला उन्हात रस्त्यावर लावण्यात आलेल्या ढकलगाड्या हटउन नागरिकांन करिता रस्ता खुला केला व शहरात गस्त सुरू केली आता वाहतूक सुरळीत होईल का? वाहतूक दाराना,दुकानदारांना वाहतूक शाखा यवतमाळात असल्याचे जाणवेल का?असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून 2017 चे सिंघम आजही आपले कर्तव्य पार पाडेल का ? असा सवाल उपस्थित होत आहे एकीकडे आनंद तर दुसरीकडे प्रश्न निर्माण होत आहे ,कारण मागील तीनचार वर्षा पासून शहरातील वाहतूक शाखा नामशेष झाल्याचे दिसून येत होते.

Copyright ©