यवतमाळ सामाजिक

शासनाने आम्हाला पट्टे द्या ,शासनाच्या सुविधा द्या

शासनाने आम्हाला पट्टे द्या ,शासनाच्या सुविधा द्या

कळंब तालुक्यातील वटबोरी (सोनखास )गट ग्रामपंचायत असून येथील नागरिकांची शासकीय जागेवर मागील 40 वर्षापासून वस्ती आहे या ठिकाणी गवळी समाज गा व इतर समाजाचे परिवार वास्तव्य करीत असून गवळी समाज दऱ्याखोरात भटकणारा समाज असल्याने आजपर्यंत शासनाने गवळी समाजाला दुर्लक्षित केले आहे हे सोणाखास येथील शासकीय वास्तव्य करीत आपला दुधाचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे मात्र ज्या ठिकाणी हा परिवार राहत असून ती जागा शासनाचे असून त्या जागी जागा शासनाने येथील परिवाराच्या नावे करून द्यावी मागील 40 वर्षापासून येथील वास्तव्यास असलेल्या समाजाला शासनाचा कोणताही फायदा होत नाही कोणत्याही प्रकारच्या योजना शासनाकडून यांना मिळत नाही त्यामुळे येथील शेकडो परिवार निराधार असल्याची सांगण्यात येत आहे अनेक येथील परिवार अनेक समस्येच्या विळख्यात आहे येथील परिवार कडे शासनाचे लक्ष तर नाहीच पण लोकप्रतिनिधीचेही दुर्लक्ष असल्याने या परिवारास शासनाने तातडीने पट्टे देऊन कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राळेगाव येथील उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे वटबोरी सोनखास गट ग्रामपंचायत असून या नागरिकांचा उपयोग केवळ मतदानापुरताच घेतला जातो मात्र यांना सोयी सुविधा देण्याकरिता कोणीही पुढे येत नाही त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहे येथील नागरिकांना तातडीने पट्टे द्यावे याकरिता शेकडो नागरिकांनी कळंब येथील तहसीलदार धीरज स्थूल व गटविकास अधिकारी सुभाष मानकर यांनाही निवेदन दिले आहे यावेळी वटबोरी ग्रामपंचायतचे सरपंच रमेश केशव झांबरे गरिबा प्रकाश धराडे दिलीप नागोराव घाटोळ धनराज गोपाळ डोळे सुनंदा गरिबा धराडे पुष्पा निखिल मांढरे अनिता दशरथ पवार सुरेखा रवींद्र काकडे दुर्गा वसंत मांढरे नंदा राजू मांढरे सुनीता प्रकाश कालोकर नीतू वसंत भड शोभा सुरेश भड संतोष पंढरी लोणकर भूत विठू शिवनकर इत्यादी नागरिकांनी पट्टे देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे

Copyright ©