महाराष्ट्र राजकीय

आमदार देवेंद्र भुयार रुग्णांसाठी ठरत आहे देवदूत ! 

वरूड तालुका प्रतिनिधी 

आमदार देवेंद्र भुयार रुग्णांसाठी ठरत आहे देवदूत ! 

१४ वर्षाच्या चिमुकल्यावर मुंबई येथे शस्त्रक्रिया !

२ लक्ष ४० हजार रुपयांची मोफत शस्त्रक्रिया, पोटे कुटुंबाला मिळाला दिलासा !

मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार हे मतदार संघामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतांना दिसून येतात. ते सातत्याने नाविन्यपूर्ण काम करण्यात अग्रेसर असतात. अशीच त्यांच्याकडे आरोग्याचा विषय घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला नेहमी सहकार्य करतांना दिसत असून रुग्णसेवेला प्राधान्य देऊन रुग्णांना दिलासा देण्याचे काम आमदार देवेंद्र भुयार करत आहे.

वरुड तालुक्यातील जरुड येथील राज प्रवीण पोटे वय – १४ वर्ष यांची २ लक्ष ४० हजार रुपयांची पायाच्या हाडाची शस्त्रक्रिया आ. देवेंद्र भुयार यांचे माध्यमातून मुंबई येथे एस आर सी सी हॉस्पिटल हाजी आली रुग्णालय मुंबई येथे मोफत करण्यात आली.

आमदार देवेंद्र भुयार यांच्या रुग्णसेवेमुळे राज पोटे यांना मुंबई येथील नामांकित रुग्णालयात दाखल करून सर्व उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे पोटे कुटुंबाला दिलासा मिळाला. आमदार देवेंद्र भुयार यांच्या या जागरूक पणामुळे फार मोठा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे पोटे परिवाराने आमदार देवेंद्र भुयार रुग्णसेवक पंकज ठाकरे यांचे आभार मानले.

अनेक रुग्नांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे उपचारासाठी रुग्णांसह कुटुंबीयांची मोठी धावाधाव होतांना दिसत आहे त्यामध्ये उपचारा अभावी कोणताही रुग्ण वंचित राहू नये व त्यांच्या परिवाराचे नुकसान होऊ नये यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी रुग्ण सेवा सुरु करून रुग्णांना जगण्याचा एक आधारच दिला आहे. आमदार देवेंद्र भुयार यांच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून हजारो रुग्णांच्या कुटुंबियांना दिलासा मिळल आहे .

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Featured

Copyright ©