यवतमाळ सामाजिक

विनोद दोंदल यांनी विविध संघटनांना केली तिखटाची मदत

विनोद दोंदल यांनी विविध संघटनांना केली तिखटाची मदत

यवतमाळ – येथील उज्वल मध्ये राहणारे, नारी रक्षा समितीचे अध्यक्ष, पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे जिल्हाध्यक्ष, सकल्प फाऊंडेशनचे सदस्य विनोद दोंदल सामाजिक कार्यकर्ते यांनी यवतमाळ मध्ये सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संघटनांना मिरचीचे लाल तिखट (चटणी) देऊन केले मदत कार्य.

नुकत्याच झालेल्या जागतिक अन्नसुरक्षा दिनाचे अवचित साधून शहरात आपल्या सामाजिक कार्यामुळे प्रचलित असलेले विनोद दोंदल यांनी यवतमाळ मध्ये सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संघटनांना प्रत्येकी ३०-३० किलोच्या कट्ट्या (बोरी) मध्ये २० ते २५ कोलो मिरचीचे लाल तिखटाची (चटणी) भरून केली मदत, यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील बेघर बेवारस निराश्रित मनोरुग्ण बांधवांना निवारा देणारी संघटना नंदादीप फाऊंडेशन याचे अध्यक्ष संदीप शिंदे याच्या कडे सुपूर्त केले तर अंध व्यक्तींसाठी कार्य करणारे दिव्य दृष्टी अपंग सेवा संस्था, सेवा समर्पण प्रतिष्ठान, यवतमाळ यांच्या सुरेशभाऊ राठी याच्या सुपूर्त केले तसेच यवतमाळ मध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना भोजन सेवा संकल्प फाऊंडेशन कडून निरंतर दिल्या जाणाऱ्या शिवभावें जीवसेवा संकल्प भोजन सेवा या उपक्रमा करिता एक बोरी (कट्टा) साधारणपणे २० ते २५ किलो लालमिरचीचे तिखट मदत देऊन हातभार लावला हया वेळी सुरेशभाऊ राठी, संदीप शिंदे, बक्षी साहेब, निलेश ठोमरे, शेंडे साहेब, रवी ठाकूर, रवी माहुरकर, रामरावजी मोरे, गणेश शेंडे, सविताताई शेंड, पुनमताई शेंडे, चेतन भवरे, सुनील संकोचवार, महादेव काचोरे इत्यादी विविध संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. विनोद दोंदल यांनी तिन्ही सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनांना एकूण ७० ते ७५ किलो मिरचीचे लाल तिखट वाटप केले हया उत्तम कार्या बद्दल जनतेकडून विनोद दोंदल यांचे कौतुक केल्या जात आहे.

Copyright ©