वाहन धारकानो सावधान ! तुमच्या सोबतही घडू शकते
राष्ट्रीय राज्य महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे याचे कारण,कुणी अपघात तर घडवत नाही ना! असा प्रश्न पडतो आहे
४ डिसेंबर २०२३ च्या रात्री १ वाजताच्या दरम्यान पुसद येथून विवाहाचा कार्यक्रम आटोपून यवतमाळ कडे येत असताना नागपूर तुळजापूर महामार्गावरील हिवरी आणि भांब ( राजा ) या दोन्ही गावाच्या मधात हिवरी जवळ काही अज्ञात तरुण दिव्ह्यडर च्या मधात बसून होते आणि चारचाकी वाहनास पाहून जवळ येताच अचानक त्या अनोळखी युकानी एक मोठा दगड येणाऱ्या कार समोर फेकला सुदैवाने त्या कारचा काठ त्या दगडावरून गेला त्याच क्षणी समोरील टायर ची दिक्क्ष वाकली आणि टायर फुटला चालकाच्या ही बाब लक्षात आल्याने आपले वाहन सांभाळत फुटलेल्या टायर वरच घटने पासून २ कि. मि.चालवले ते वाहन चालण्याची क्षमता संपल्याने ती कार थांबली या वेळी त्या कार मध्ये तीन महिला व दोन पुरुष होते त्यांची भंबेरी उडाली थंडीत त्यांना घाम फुटला व त्या वेळी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष ओंकार चेकें यास फोन करून घटना स्थळी बोलावले काही वेळातच दोन दुचाकी वारी सहा युवक तोंड बांधून आपल्या दुचाकीने त्यांचे जवळून हळू हळू गेल्याने त्या कार प्रवाशांन मध्ये मोठ्या प्रमाणात घाबरन्याचे प्रमाण वाढतच होते पोलिसांना पाचारण केले मात्र ते पोलीस कधीच वेळेवर येतातच असे नाही मात्र पत्रकार पोहचल्याने त्या तोडसांम परिवारांचा जीवात जीव आला त्यावेळी यवतमाळ येथून पुनः एक कार बोलवण्यात आली व चेके यांनी त्या कारचा टायर बदली करून दिला हा घटना क्रम जवळपास दीड तास चालला मात्र पोलीस मदतीला आले नाही हे विशेष आणि दोन्ही कार सोबत यवतमाळ कडे रवाना करून दिल्या अशा घटना कुठेही होऊ शकते म्हणून वाहन धारकांनी आपले वाहन सावध पने चालवून शक्य तो पर्यंत रात्री चा प्रवास टाळावा .
Add Comment