Breaking News यवतमाळ

रेती तस्करांच्या टॅक्टरने ऑटो रिक्षाला जोरदार धडक; तीन गंभीर चार जखमी

प्रतिनिधी रुई ( वाई) वैभव कोकिवार

रेती तस्करांच्या टॅक्टरने ऑटो रिक्षाला जोरदार धडक; तीन गंभीर चार जखमी

ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रुई येथे वाई रोड वर रितीने भरलेला भरधाव टॅक्टर ने ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिल्यामुळे ऑटो रिक्षातील शाळेतील विद्यार्थी तीन जखमी व चार गंभीर जखमी झाले आहे येथे शाळकरी मुलांनी भरलेला ऑटोला रेतीच्या टॅक्टर् ने धडक दिल्याने ही धडक एवढी भीषण होती की ऑटो मधील काही मुले व मुली टॅक्ट्रर खाली व रस्त्यावर पडले आणि गंभीर जखमी झाले .आजूबाजूच्या लोकांनी घटना स्थळ गाटून ट्रॅक्टर मधील रेती खाली करून खाली अडकलेल्या 7 विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. गावातील रेती घेवून जात असलेल्या ट्रॅक्टर ने धडक दिली ही घटना बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास घडली त्यांना शाळेतील शिक्षक यांनी बेलोरा येतील रुग्णालयात नेण्यात आले तेथील डॉक्टरांनी तात पुरता इलाज करून विद्यार्थ्यांना मार जास्त असल्यामुळे यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.माहिती नुसार टॅक्ट्रर चालक पळून गेला.या बाबतची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार व मंडळ अधिकारी व तलाठी त्यांचे कर्मचारी घटना स्थळी येवून पंचनामा करून ट्रॅक्टर जप्त केला रुई.येथे रेती तस्करीचे प्रमान वाढले आहे याची प्रशासनाने दखल घ्यावी व रेती तस्करी करणाऱ्या चोरट्या वर योग्य ती कारवाई करावी अशी गावकऱ्यांची व पालकांची मागणी आहे प्रशासनाचे अधीकारी व कर्मचारी रेती तस्करी करणाऱ्या सोबत चिरी मिरी झाल्याचे गावातील नागरिक म्हणत आहे.

Copyright ©