महाराष्ट्र सामाजिक

विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिन

विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिन

अडगाव येथून भव्य शांती मार्च काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली.त्यानंतर शांतीयात्रेचा समारोप सभेमध्ये झाला. यावेळी आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार युवा वक्ते मा.राहुलभाऊ सुरवाडे यांनी, उपस्थित जनसमुदायास संबोधित करतांना सांगितले कीं, भारताच्या कीर्तिवंत सुपुत्रांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. भारत देशाच्या इतिहासातील पहिले सर्वश्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. देशाच्या सामाजिक-राजकीय क्षितिजावर त्यांचा उदय इ.स. १९२० च्या दशकात झाला. समाजाच्या, अस्पृश्य म्हणून हिणविल्या गेलेल्या अगदी तळातील वर्गाच्या पुनरुत्थानासाठी सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक पातळीवर तेव्हापासूनच त्यांचा संघर्ष सुरू होता. बाबासाहेब एक थोर विचारवंत होते आणि त्यांनी अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विधिज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, संसदपटू आणि या सर्वांच्या पलीकडे जाऊन समाजसुधारक व मानवाधिकारांचा रक्षक या नात्याने केलेले कार्य अतुलनीय आहे. देशभरातील अस्पृश्य समाजाला एकवटून, संघटित करून सामाजिक समतेच्या ध्येयाप्रत जाण्याच्या दृष्टीने राजकीय मार्ग कसा अवलंबायचा, याविषयी त्यांनी दिशादर्शन केले. आज तें अंगिकारण्याची नितांत गरज असुन तीच खरी त्यांना मानवंदना असेल असे त्यांनी सांगितले.!

बोरी आणि अडगाव या दोन्ही गावातून निघालेल्या या शांती यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ बंधू-भगिनी बालकांचा प्रचंड सहभाग दिसून आला आपल्या हातातील पुष्प टाकून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली.

यावेळीं धर्माजी सुरवाडे रमेश सुरवाडे विनोद सुरवाडे माणिक सुरवाडे नंदाबाई सुरवाडे प्रतिभा सुरवाडे संगीताबाई सुरवाडे, सोनाली ईखारे, उमेश सुरवाडे, काजल सुरवाडे, स्नेहल सुरवाडे, सुनीता सुरवाडे निकिता सुरवाडे , रामदास वाघमारे, प्रल्हाद दुतोंडे, हिम्मत सुरवाडे तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ सहभागी होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
ऋतुजा, करण, पलक, प्रिन्स व रितेश यांनी प्रयत्न केले!

Copyright ©